शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संविधान अंमलबजावणीतून समानता

By admin | Updated: March 13, 2016 01:20 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या भारतीय संविधानात समान संधी, समान दर्जा याचा प्रास्ताविकेतच उल्लेख आहे.

सी. एल. थूल यांचे प्रतिपादन : एससी-एसटीच्या संवैधानिक तरतुदी व मानवी हक्कांवर चर्चासत्रगडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या भारतीय संविधानात समान संधी, समान दर्जा याचा प्रास्ताविकेतच उल्लेख आहे. भारतीय संविधान जगात उत्कृष्ट संविधान आहे. या संविधानाची प्रशासकीय यंत्रणेकडून काटेकोर अंमलबजावणी झाल्यास देशात समानता प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्या. सी. एल. थूल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळ गोकुलनगर गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील सम्यक बुध्द विहाराच्या सभागृहात आयोजित ‘अनुसूचित जाती- जमातीच्या संवैधानिक तरतुदी व मानवी हक्क’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी नेते मारोतराव कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, समितीचे अध्यक्ष रोहिदास राऊत, प्रा. डॉ. बाबू कऱ्हाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती थूल म्हणाले, व्यक्ती हा भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू आहे. भारताचे मूळ संविधान कोणी बदलवू शकत नाही. काळानुरूप संविधानात सुधारणा करण्याची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान बदलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी हा डाव हाणून पाडला. भारतीय संविधानात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकारांच्या तरतुदी समाविष्ट आहेत. हजारो वर्षांपासून विकास व मानवी हक्कापासून दूर राहिलेल्या मागासवर्गीय नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधानात आरक्षणाची भरीव तरतूद केली. या मागे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात समानता हा त्यांचा एकमेव उद्देश होता, असेही न्यायमूर्ती थूल यावेळी म्हणाले. स्त्री-पुरूष समानतेची तरतूदही भारतीय संविधानात असल्याने भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे, त्याकरिता सर्व मागासवर्गीयांनी संघटित राहावे, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी मारोतराव कांबळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौतम डांगे, संचालन बोरकर यांनी केले तर आभार जगन जांभुळकर यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)केंद्राचे नोकरभरतीचे रोस्टर अन्यायकारकमहाराष्ट्र राज्याच्या नोकरभरतीबाबतच्या रोस्टर (बिंदू नामावली) मध्ये पहिल्या क्रमांकावर अनुसूचित जाती, दुसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जमाती व त्यानंतर इतर मागासवर्गीयांचा समावेश आहे. मात्र केंद्र सरकारने तयार केलेल्या रोस्टरमध्ये पहिल्या क्रमांकावर खुला प्रवर्ग ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या अन्यायकारक रोस्टरमुळे एससी, एसटी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती होत नाही, असे न्यायमूर्ती थूल यांनी यावेळी सांगितले.