शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी पंचायत समिती सभापतिपदाची उत्कंठा शिगेला

By admin | Updated: March 5, 2017 01:24 IST

जिल्हा परिषदेची सत्ता हाती घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू आहे.

भाजपला स्पष्ट बहुमत : कुणाची लागणार वर्णी याकडे लागले आहे तालुक्यातील जनतेचे लक्ष रत्नाकर बोमीडवार   चामोर्शी जिल्हा परिषदेची सत्ता हाती घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू आहे. पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेकडे जवळपास दुर्लक्ष झाले आहे. पंचायत समिती सत्ता सूत्रे हाती घेण्यासाठी सर्वत्र शांतता दिसत असली तरी अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. चामोर्शी पंचायत समितीत भाजपला बहुमत असल्याने भाजपचाच सभापती व उपसभापती होईल. मात्र नेमक्या कोणत्या सदस्याच्या गळ्यात सभापती व उपसभापती पदाची माळ पडणार आहे, याकडे चामोर्शी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीच्या एकूण १८ जागांपैकी भाजपने १३ जागा, काँग्रेसने २ जागा, जनसेवा विकास मंचाने २ तर शिवसेनेने १ जागा जिंकली आहे. चामोर्शी पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे भाजपचाच सभापती व उपसभापती बनणार हे निश्चित झाले आहे व त्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मागील वेळी सुद्धा चामोर्शी पंचायत समितीवर भाजपाचीच सत्ता होती. प्रथम अडीच वर्ष वर्षा भांडेकर सभापती व मनमोहन बंडावार उपसभापती होते. अडीच वर्षानंतर सभापती म्हणून शशिबाई चिळंगे व उपसभापती म्हणून केशवराव भांडेकर यांनी सत्तासुत्रे हाती घेतली. परंतु एका वर्षातच भाजपात बंडखोरी होऊन आपल्याच पक्षाच्या केशव भांडेकर यांना उपसभापती पदावरून पायउतार केले व या जागेवर मंदा दुधबावरे यांना विराजमान केले. त्यावेळी भाजपच्या तब्बल पाच सदस्यांनी व्हीप नाकारल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मागील पाच वर्षात पंचायत समितीत चांगलीच रस्सीखेच दिसून आली होती. ही रस्सीखेच यापुढेही दिसून येणार आहे. सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारांच्या नावाची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये माजी भाजपा तालुकाध्यक्ष व माजी पं. स. उपसभापती आनंद भांडेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी कुनघाडा (रै.)-तळोधी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपाची उमेदवारी मागीतली होती व त्यांच्या पत्नी माजी पं. स. सभापती वर्षा भांडेकर यांनी विसापूर (रै.)-कुरूळ जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपकडे उमेदवारी मागीतली होती. परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही जि. प. ची उमेदवारी न देता आनंद भांडेकर यांना कुनघाडा (रै.) पं. स. ची उमेदवारी दिली. यावेळी त्यांना पं. स. सभापती पदाची कमिटमेंट भाजप पक्षश्रेष्ठींनी भांडेकर यांच्यासोबत केली होती, अशी चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आनंद भांडेकर हे सभापती पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र त्याचवेळी इतर क्षेत्रातूनही नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. चामोर्शी पंचायत समितीचे सभापती पद बहुजन समाजातील विशिष्ट समाजाच्या व्यक्तीलाच मिळत आहे. बहुजन समाजाचाच घटक असलेल्या कुणबी समाजाला सर्वांनीच डावलल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यातही कुनघाडा (रै.), तळोधी (मो.), विक्रमपूर, कुरूळ, घोट याच गणातील व्यक्ती सभापती व उपसभापती अनेकवेळा विराजमान झाले आहेत. त्यामुळे इतरही गणांचा व समाजाचा विचार व्हावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत चालली आहे. त्यादृष्टीने वंदना गौरकार यांचेही नाव सभापती पदासाठी समोर येत आहे.