शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गुजरीत जड वाहनांसाठी रस्ता द्या

By admin | Updated: June 12, 2014 00:04 IST

येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

गडचिरोली : येथील सर्वोदय वार्डातील गुजरीकरिता जड वाहनाच्या वाहतुकीसाठी कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मात्र रस्त्याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास गुजरीतील भाजीपाला विक्री बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत गुजरीतील विक्रेत्यांनी दिला.यावेळी माहिती देतांना सर्वोदय सब्जी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र बाळेकरमकर म्हणाले, गुजरीत भाजीपाल्यांची जडवाहने येण्यासाठी रस्ता नाही. सध्या विठ्ठल मंदिराच्या बाजुचा एकच मार्ग आहे. मात्र या मार्गावरील नाली फुटली असून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात सदर नाली पूर्णत: खचणार आहे. यामुळे पावसाळ्यात सदर रस्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात रस्त्याअभावी विक्रेत्यांना भाजीपाला दुकानस्थळी नेण्यासाठी अडचण निर्माण होते. यामुळे नगर परिषद प्रशासनाने ठोस पावले उचलून गुजरीकरिता जडवाहनासाठी कायमस्वरूपी रस्ता निर्माण करून द्यावा, अशी मागणी बाळेकरमकर यांनी यावेळी केली.रस्ता समस्येची तक्रार नगर परिषदेकडे करण्यात आली. त्यानंतर न. प. चे मुख्याधिकारी रविंद्र ढाके यांनी अभियंत्यासह गुजरीला भेट देऊन पाहणी केली. भाजी विक्रेत्यांशी चर्चा केली. मात्र रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. गुजरी भाजी बाजारामधून लिलावाच्या माध्यमातून नगर परिषेदला मोठ्या प्रमाणा उत्पन्न मिळते. आठवडी बाजार व गुजरीचा मिळून १२ लाख रूपयाचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव महेश हजारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला शरद चापले, सुरज शिरपूरकर, प्रविण पुप्पलवार, महेश चिलबुले, शामसुंदर निलेवार, भोजराज खोडवे, प्यारेअली सय्यद, कालिदास लटारे, दिनेश कांबळे, वामन गिरडकर, यशवंत भुरसे, भूषण थोरात, निलेश आंबोरकर, मिलिंद लिंगायत, सुरेश सोनटक्के, अतुल कुनघाडकर, तुपीन घोष, अमोल बाळेकरमकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)