शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा मार्गावरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:23 IST

शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते.

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : रात्रीतून तयार केलेले झोपडीवजा घर पाडले

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कुरखेडा मार्गावरील पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या प्रवेशद्वारासमोर काही नागरिकांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत ठोस निर्णय घेत वनविभागाने येथील अतिक्रमण महसूल व पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून बुधवारी काढले.कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या संरक्षण भिंतीलगत काही नागरिकांनी अतिक्रमण केले. तसेच काही अतिक्रमणधारकांनी रात्रीतून झोपडीवजा घर तयार केले. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना मिळाली. देसाईगंजचे वनपरिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेकर यांच्या नेतृत्वात महसूल मंडळ अधिकारी व पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत कुरखेडा मार्गावरील सदर अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी बांधण्यात आलेले झोपडीवजा घर पाडण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या भागात वनविभागाची मोकळी जागा असल्यामुळे अतिक्रमण करण्यासाठी अनेक नागरिक सरसावतात. अतिक्रमण करणे ही नागरिकांची नित्याची बाब झाली आहे.अशाच प्रकारचे अतिक्रमण सिरोंचा, आलापल्ली तसेच गडचिरोली वन विभागात अनेक ठिकाणी झाले आहे. मात्र याकडे स्थानिक वनाधिकाºयांचा कानाडोळा होत आहे.