शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलावरील अतिक्रमण हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:03 IST

अतिशय चर्चेचा विषय ठरलेल्या चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण कायदेशिर मार्गाने हटविले जाईल, ....

ठळक मुद्देआमदारांची माहिती : बांधकामाचे बजेट वाढणार

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : अतिशय चर्चेचा विषय ठरलेल्या चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण कायदेशिर मार्गाने हटविले जाईल, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी मंगळवारी चामोर्शी येथे तहसील कार्यालयात पार पडलेल्या तालुका क्रीडा संकूल कार्यकारिणी समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण केव्हा हटणार याकडे तालुकावासीयांचे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे.१० कोटी रूपयांचा खर्च करून सर्व सोयीसुविधा युक्त तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती नियोजित तीन हेक्टर जागेवर केली जाणार आहे. या क्रीडा संकुलाच्या जागेचे सर्वेक्षण वास्तूशिल्पज्ञ सुधीर श्रीवास्तव यांनी करून ७.७७ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक व आराखडा तयार केला होता. या आराखड्यावरही चर्चा करून काही दुरूस्त्या सूचविण्यात आल्या. त्यामुळे नवीन अनुदानास पत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तालुक्यातील खेळाडूंच्या क्रीडा प्रतिभेला योग्य दिशा देण्यासाठी व ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकूल उपयोगी ठरणार आहे. मंजूर तीन कोटी रूपयांशिवाय उर्वरित निधी व प्रशासकीय मान्यतेकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करून मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. क्रीडा संकूल लवकर मार्गी लावले जाईल, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. या सभेला तहसीलदार अरूण येरचे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, उपअभियंता उरकुडे, तालुका क्रीडा अधिकारी मदन टापरे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, तनगुलवार, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक देवतळे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, उपाध्यक्ष जयराम चलाख, वास्तू विशारद सुधीर श्रीवास्तव उपस्थित होते.असे राहणार क्रीडा संकूलचामोर्शी येथे निर्माण होणाºया तालुका क्रीडा संकुलामध्ये ४०० मीटर धावपट्टी, फुटबॉल, व्हॉलिबॉल मैदान, मल्टीपर्पज हॉल, दोन बॅडमिंटन कोर्ट, बॉस्केट बॉल ग्राऊंड कम स्केटिंग ग्राऊंड, वॉटर टू सप्लाय प्ले ग्राऊंड, संरक्षक भिंत, स्टेटस गॅलरी, आॅफिस बिल्डींग, स्त्री-पुरूष शौचालय, सोलर लाईट सिस्टिम आदी मैदान व सोयीसुविधा राहणार आहेत. तालुका क्रीडा संकूल भव्य व सुसज्ज राहणार असून यासाठी अंदाजे १० कोटी रूपये खर्च होणार आहेत.तालुका क्रीडा संकुलाकरिता सर्वे क्र. १४४२/१ मधील ८.२८ हेक्टर आर पैकी ३ हेक्टर आर जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आली असून या जागेचा ताबा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना मागील वर्षीच्या १५ डिसेंबरला देण्यात आला. सध्या क्रीडा संकुलासाठी तीन कोटी रूपये मंजूर आहे.