शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

बसस्थानकाजवळील अतिक्रमण कायम

By admin | Updated: November 14, 2015 01:34 IST

स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही.

प्रशासनाचे दुर्लक्ष : गर्दीमुळे अपघातात झाली वाढ; प्रवाशांच्या आवागमनासही होत आहे अडथळागडचिरोली : स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही. हीच समस्या बस आगारामध्ये जात असतानाही निर्माण होते. परिणामी अपघातांचे प्र्रमाण वाढले आहे. मात्र या गंभीर समस्यकडे नगर परिषदेसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हास्थळावरील आगार असल्याने या आगारातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो बसेस धावतात. त्याचबरोबर इतर आगारातूनही गडचिरोली आगारात बस येतात. समोरच तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असल्याने या परिसरात नेहमीच वाहन व नागरिकांची वर्दळ राहते. आगारासमोरच्या मुख्य मार्गाला लागून असलेल्या जागेवर फळ विक्रेते, चहा विक्रेते, पानटपरीधारक व सलून दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहेत. या दुकानांमुळे आगाराकडे जाण्याचे मार्ग केवळ खुले आहेत. इतर जागेवर अतिक्रमण वाढले आहे. परिणामी आगारातून मुख्य मार्गाकडे येणारी बस वाहनधारकांच्या दिसत नाही. त्यामुळे बस व इतर वाहनांच्या धडकेच्या घटना अलिकडेच वाढल्या आहेत. आगारामध्ये बस जातानाही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणामुळे आगाराचे सौंदर्यही नष्ट झाले आहे. नगर परिषदेने अनेकवेळा या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो एक फार्सच ठरला आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत असून ही समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अतिक्रमणधारकांमुळे अनेकांना आपले जीव गमवावा लागत आहे. तर दोष नसतानाही बसचालकांना कारवाईस सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यात येथे बसस्थानकच्या बसच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. बसस्थानकात प्रवेश करताना अनेक प्रवाशी येथीलच फळ व अन्य साहित्य खरेदी करीत असल्याने बसस्थानकाच्या रस्त्यालगत गर्दी असते. शिवाय परिसरात खासगी वाहनेही उभी असतात. त्यामुळे बसेसच्या आवागमनास तसेच येथील अन्य नागरिकांच्या आवागमनास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.