शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पट्टेधारकांच्या जमिनीवर अतिक्रमण

By admin | Updated: August 25, 2015 01:35 IST

परिसरातील आदिवासी गरीब भूमीहिनांना सन १९७७-७८ मध्ये महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील चामोर्शी चक येथील

आरमोरी : परिसरातील आदिवासी गरीब भूमीहिनांना सन १९७७-७८ मध्ये महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील चामोर्शी चक येथील जमिनी वाटपात दिल्या आहे. या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर काही धनाढ्य लोकांनी अतिक्रमण केले. आदिवासींच्या जमिनी हडप करणाऱ्यांवर अनुसूचित जाती, जमाती कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अतिक्रमण काढून पट्टेधारकांना कब्जा देण्यात यावा आदींसह विविध मागण्यांसाठी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. आरमोरी तालुक्यातील ७८ आदिवासी भूमीहिन शेतकऱ्यांना सन १९७७-७८ मध्ये शासनाने चामोर्शी चक येथे २२६.४२ हेक्टर आर शेतजमिनीचे पट्टे वितरित केले. काही श्रीमंत लोकांनी आदिवासींच्या शेत जमिनीवर कब्जा केला. देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टाने अतिक्रमण धारकांचे बळजबरीने केलेले अतिक्रमण अवैध ठरविले. तसेच गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पट्टेधारक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अतिक्रमणधारकांनी हस्तक्षेप करू नये, असे आदेशही दिले. देसाईगंजच्या एसडीओंनी आरमोरीच्या तहसीलदारांना सदर अतिक्रमणाबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देऊन सुद्धा आरमोरीच्या तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. पट्टेधारक शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. आ. क्रिष्णा गजबे यांनी तहसीलदारासह उपोषण मंडपास भेट दिली. याप्रकरणात आपण लक्ष घालून प्रत्यक्ष मोका चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन आ. गजबे यांनी दिली. त्यानंतर लिंबूशरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)