शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचात अतिक्रमण हटविले

By admin | Updated: October 2, 2016 01:57 IST

सिरोंचा शहराच्या प्रवेशद्वारावर, बसस्थानकाच्या बाजूला महसूल विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्या २० वर्षांपासून अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते.

२० वर्षांपासून होते अतिक्रमण : नगर पंचायत व महसूल विभागाची संयुक्त कारवाईसिरोंचा : सिरोंचा शहराच्या प्रवेशद्वारावर, बसस्थानकाच्या बाजूला महसूल विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्या २० वर्षांपासून अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपले दुकान थाटले होते. महसूल व नगर पंचायत प्रशासनाने संयुक्तरीत्या शुक्रवारी धडक मोहीम हाती घेऊन या परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटविले. सदर जागेवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पानटपरी, हॉटेल व इतर दुकाने थाटली होती. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांनी रस्ता रूंदीकरण व नगर विकासाच्या दृष्टीकोणातून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सदर अतिक्रमीत जागेवरील अतिक्रमण हटविले. त्यानंतर मुख्याधिकारी नंदनवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अतिक्रमीत जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांनी सदर जागा बळकाविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायालयाने नगर पंचायत प्रशासनाच्या बाजुने निकाल दिला. त्यानंतर मुख्याधिकारी नंदनवार यांनी पुढाकार घेऊन अतिक्रमीत जमिनीवरील तब्बल ४० व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले. येथील विक्रेत्यांना आता जुन्या बाजारपेठेत दुकाने देण्यात येणार आहे. त्यासाठी गाळे व ओट्यांची व्यवस्था करण्यात आली असून हातपंपही बसविणार असल्याचे मुख्याधिकारी नंदनवार यांनी सांगितले. प्रशासकांच्या कार्यकाळात नगर पंचायतीच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यात आलेले आहे. अशा लोकांवर सुध्दा कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यावेळी म्हणाले. अंतर्गत रस्त्याची दुरवस्था बघता येणाऱ्या काळात शहरातील सर्वंच अंतर्गत रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजू पेदापल्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर अतिक्रमण कारवाई दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी महसूल विभागातर्फे तहसीलदार अशोक कुमरे, मंडळ अधिकारी मंडावार, लिपीक पुप्पालवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी भरत नंदनवार, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, नगरसेवक शेख, सतीश भोगे, पोलीस उपनिरिक्षक दाभाडे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)