शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: July 6, 2015 01:55 IST

स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही.

गडचिरोली : स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही. हीच समस्या बस आगारामध्ये जात असतानाही निर्माण होते. परिणामी अपघातांचे प्र्रमाण वाढले आहे. मात्र या गंभीर समस्यकडे नगर परिषदेसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हास्थळावरील आगार असल्याने या आगारातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो बसेस धावतात. त्याचबरोबर इतर आगारातूनही गडचिरोली आगारात बस येतात. समोरच तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असल्याने या परिसरात नेहमीच वाहन व नागरिकांची वर्दळ राहते. आगारासमोरच्या मुख्य मार्गाला लागून असलेल्या जागेवर फळ विक्रेते, चहा विक्रेते, पानटपरीधारक व सलून दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहेत. या दुकानांमुळे आगाराकडे जाण्याचे मार्ग केवळ खुले आहेत. इतर जागेवर अतिक्रमण वाढले आहे. परिणामी आगारातून मुख्य मार्गाकडे येणारी बस वाहनधारकांच्या दिसत नाही. त्यामुळे बस व इतर वाहनांच्या धडकेच्या घटना अलिकडेच वाढल्या आहेत. आगारामध्ये बस जातानाही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणामुळे आगाराचे सौंदर्यही नष्ट झाले आहे. नगर परिषदेने अनेकवेळा या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो एक फार्सच ठरला आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत असून ही समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अतिक्रमणधारकांमुळे अनेकांना आपले जीव गमवावा लागत आहे. तर दोष नसतानाही बसचालकांना कारवाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)