शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम करा

By admin | Updated: September 22, 2016 02:27 IST

पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तर सामुहिक वनहक्क कायद्याने बिगर पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना तेंदू, बांबूची तोड,

अधिकाऱ्यांचे आवाहन : पोटेगावात तेंदू, बांबू व्यवस्थापनावर कार्यशाळागडचिरोली : पेसा कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील तर सामुहिक वनहक्क कायद्याने बिगर पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना तेंदू, बांबूची तोड, विक्री व व्यवस्थापन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. या व्यवस्थापनात जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून ग्रामसभांनी चढ्या दराने बांबू व तेंदूची विक्री करावी, गाव विकासासाठी भरघोस उत्पन्नातून गावांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे, असे आवाहन उपस्थित वनाधिकारी व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले. सन २०१६-१७ या वर्षात तेंदू आणि बांबूची तोड, विक्री आणि व्यवस्थापनाबाबत ग्रामसभा कोष व साधनसंपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव यांची कार्यशाळा पोटेगाव येथील सांस्कृतिक भवनात मंगळवारी पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून चातगावचे वन परिक्षेत्राधिकारी कैदलवार, गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, जिल्हा पेसा समन्वयक नितीन वाघमारे, वन परिक्षेत्राधिकारी कंगाले, होकम, तुपे, घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. तेंदू व बांबू तोड लिलाव प्रक्रिया योग्यरित्या पार पाडण्यासाठी ग्रामसभेच्या अध्यक्ष व सचिवांना वन परिक्षेत्राधिकारी कैदलवार व पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या संदर्भात ग्रामसभांना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेला देवापूर, जामगाव, राजोली, मारदा, मारोडा, पोटेगाव, वाकडी, चांदाळा, मुडझा, सावेला, विहीरगाव येथील पदाधिकारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रतन शेंडे, संचालन दीपक कांबळे यांनी केले तर आभार प्रवीण दुर्गे यांनी मानले. (प्रतिनिधी)