शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हक्कातून ग्रामसभांना सक्षम बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:58 IST

भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे.

ठळक मुद्दे मान्यवरांचा सूर : न्याहाळकलच्या टिपागड देवस्थानात यात्रा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधव संघटीत होऊन आपली संस्कृती वाचविण्यासाठी सर्वप्रथम ग्रामसभांना सक्षम बनवावे, असे प्रतिपादन डॉ. योगाजी कराडे व अन्य मान्यवरांनी केले.पारंपरिक इलाका ग्रामसभा मुरूमगाव व कटेझरी क्र. २ व तालुक्यातील न्याहाळकल ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी टिपागड देवस्थानात यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सदर कार्यक्रमात टिपागड यात्रा देवी, देवतांची पूजा व आदिवासी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गाव प्रमुख महागू पुलो यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुरूमगाव जमिनदारीचे प्रमुख भूपेंद्रशहा मडावी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंडियन ट्रायबल व्हॅलेंटिअर आर्गनायझेशनचे संघटनप्रमुख विजय सिडाम, अ‍ॅड. उमेश मडावी, हरीश सिडाम, श्यामराव कतलामी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अनिल केरामी, गंगाराम आतला, वासुदेव आतला, गणपत कोल्हे, महिला ग्रामसभा अध्यक्ष छाया पोटावी, चम्पा होळी, सुशीला कुडो, ईश्वर कुमरे, संतोष एका, रूपसिंग हिडको, डॉ. बन्सोड, डॉ. नंदू मेश्राम, मतलाम नैताम, राजाराम गोटा, सुखरू कड्यामी, हिरामन हलामी, मुकेश नरोटे, लालसाय तुलावी आदी हजर होते.नृत्यातून संस्कृतीचे दर्शनसदर यात्रा महोत्सवात आदिवासी नागरिकांनी पारंपरिक नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना घडविले. येथे महाराष्टÑ, छत्तीसगडसह बंदूर, दराची, बोटेझरी, कटेझरी, दर्रेकसा भागातील शेकडो आदिवासी बांधव हजर होते.