शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत सेवकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:23 IST

जिल्ह्याच्या दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील विशेषत: जिल्ह्याच्या सात तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी २०१६-१७ या सत्रासाठी प्रायोगिक तत्त्वावर ग्राम विद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली होती.

ठळक मुद्देएक वर्षाची मुदतवाढ : ऊर्जामंत्र्यांनी दिले पुनर्नियुक्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : जिल्ह्याच्या दुर्गम, डोंगराळ व आदिवासी भागातील विशेषत: जिल्ह्याच्या सात तालुक्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी २०१६-१७ या सत्रासाठी प्रायोगिक तत्त्वावर ग्राम विद्युत सेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते. सदर समस्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अन्यायग्रस्तांनी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी १५६ ग्राम विद्युत सेवकांना एक वर्षाची मुदतवाढ देत त्यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले आहेत.जिल्ह्याच्या सात तालुक्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वीज सेवकाची नियुक्ती करण्यात आली. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा व कोरची तालुक्यात नियुक्ती करण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उलटूनही पुनर्नियुक्ती आदेश दिले नव्हते. सदर समस्या ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे मांडण्यात आली. त्यांनी सात तालुक्यातील ग्राम विद्युत सेवकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. तसेच सात तालुक्यातील ग्राम पंचायतींना कुठल्याही प्रकारचे विद्युत विषयक कर्मचारी नेमू नयेत, असे आदेशात म्हटले आहे.यापूर्वी विद्युत व्यवस्थापक नेमण्याची प्रक्रिया ग्राम पंचायत स्तरावर सुरू होती. जिल्ह्याच्या सात तालुक्यातील १५६ ग्राम विद्युत सेवकांना पुनर्नियुक्ती आदेश देऊन त्यांना कर्तव्यावर रूजू करून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील ग्राम विद्युत सेवकांना न्याय मिळाला आहे, असे आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे यांनी म्हटले आहे.पाच महिन्यांपासून प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्याच्या सात तालुक्यातील १५६ ग्राम विद्युत सेवकांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात आले नव्हते. मागील पाच महिन्यांपासून ते पुनर्नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. परंतु आता ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशाने ग्राम विद्युत सेवकांना पुनर्नियुक्तीची असलेली प्रतीक्षा संपली आहे.