शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सव्वा दोन हजार कुटुंबांना रोजगार

By admin | Updated: December 13, 2014 22:37 IST

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार

आठ महिन्यात १०० दिवस मिळाले मजुरांना कामगडचिरोली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक असून १ लाख ८ हजार ३६५ नागरिकांना रोजगार पुरविला आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने २००५ साली महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी व इतर विकासाची कामे केली जातात. गडचिरोली जिल्ह्यात चार महिने धानाची शेती सोडल्यानंतर आठ महिने बसूनच राहावे लागते. त्यामुळे रोहयोवर काम करण्यास मजूर मिळतात. त्याचबरोबर नक्षलप्रभावित जिल्हा असल्याने रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी गडचिरोली जिल्ह्याला प्राप्त होतो. सदर निधीतून रोहयोची कामे वर्षभर राबविली जात असल्याने गडचिरोली जिल्हा रोहयोच्या माध्यमातून रोजगार पुरविण्यात चौथ्या स्थानावर आहे. चालू आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाने २ हजार २५३ कुटुंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ७ लाख ४९ हजार ३११ दिवसांचा रोजगार महिलांना प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने नियमित रोजगाराची नेहमीच चणचण भासते. येथील मजुरांना नेहमीच कामाची शोधाशोध करावी लागते. मिळेल ते काम करावे लागते. तरीही रोजगार मिळत नसल्याने येथील मजुरांना दुसऱ्या जिल्ह्यात रोजगारासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत रोहयोची कामे जवळपास वर्षभर चालत असल्याने नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. रोहयोचे पैसे आता सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. त्यामुळे या योजनेत असलेला गैरव्यवहार फार कमी झाला असून लाभार्थ्यांला त्याच्या कामाचा मोबदला मिळू लागला आहे. त्यामुळेही रोजगार हमी मजुरांमध्ये उत्साह दिसून येत आहे. थोडाफार उशीरा पैसा मिळत असला तरी सदर पैसा बुडत नाही. याची शाश्वती मजुरांना असल्याने रोहयो कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)