शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दीड हजारावर मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या योजनेतून दिली जात असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याची प्रतिक्रिया बीडीओ श्रावण सलाम यांनी दिली.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुका : आठ ग्राम पंचायतअंतर्गत रोजगार हमीच्या कामांना सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज :लॉकडाऊनमुळे शेतमजूर, भूमिहीन, मजूर व हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या घटकाला दिलासा देण्यासाठी जि. प. द्वारे देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रा. पं. स्तरावरील एकूण १८ कामांना सुरूवात झाली आहे. तालुक्यातील आठ ग्रा. पं. अंतर्गत एकूण १ हजार ६४७ मजुरांना रोजगार मिळाला आहे.देसाईगंज पं. स. अंतर्गत एकूण २० ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापैकी आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या योजनेतून दिली जात असल्याने तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याची प्रतिक्रिया बीडीओ श्रावण सलाम यांनी दिली.बीडीओंची कामावर भेटदेसाईगंजचे बीडीओ श्रावण सलाम यांनी रोजगार हमीच्या कामावर प्रत्यक्ष भेट देऊन मजुरांना योग्य शारीरिक अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, तोंडावर रुमाल अथवा मास्क लावणे याबाबत आवाहन केले. तसेच मास्क व सॅनिटायझरचे वितरण केले. हात धुण्यासाठी मजुरांना साबन पुरविली जात असल्याची माहिती देत उर्वरित १२ ग्रा. पं. मध्ये रोहयोचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत