शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रोजगार हमीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:20 IST

मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.

ठळक मुद्देकामासाठी मजुरांची वणवण : बहुतांश कामे अर्धवटच; मजुरीही थकली

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : मागील चार महिन्यांपासून कुशल कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. काही कामे अर्धवट स्थितीत आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे अकुशल कामांचाही निधी मिळाला नाही.गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची साधने उपलब्ध नाहीत. जेमतेम शेतीच्या भरवशावर चार महिने रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतीचा हंगाम संपताच रोहयो कामांची प्रचंड प्रमाणात मागणी वाढते. रोहयोच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच विकासाचीही कामेही होतात. रोहयोचा निधी खर्च करताना ४० टक्के कुशल व ६० टक्के अकुशल हे प्रमाण जिल्हास्तरावर पाळणे आवश्यक आहे. अकुशल कामे मजुरांच्या माध्यमातून केली जातात. मजुरांचा प्रपंच दैनंदिन मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून राहतो. त्यामुळे आठवडा संपताच त्यांना मजुरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासन अकुशल कामाचा निधी कधीच कमी पडू देत नाही. पंचायत समिती स्तरावरून सॉफ्टवेअरमध्ये एन्ट्री केल्याबरोबर संबंधित मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा होते. मात्र प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मस्टर बनविण्यास तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिकबाबी पूर्ण करण्यास उशिर करतात. त्यांच्या चुकीमुळेच रोहयो मजुरांची मजुरी थकते. सध्यास्थितीत १ कोटी ५३ लाख २५ हजार रूपये मजुरी थकली आहे.रोहयोच्या माध्यमातून मजगी, बोडी, शेततळे, सिंचन विहीर, सिमेंट बंधारा, खोदतळे, वर्मी, कंपोस्ट, पांदन रस्ते आदी कामे केली जातात. ही कामे करण्यासाठी साहित्याची गरज भासते. सदर साहित्य ग्राम पंचायत आपल्या स्तरावर खरेदी करते. याला रोहयोच्या भाषेत अकुशल निधी असे संबोधल्या जाते. अकुशल निधीचा मात्र मागील दोन वर्षांपासून सातत्त्याने तुटवडा पडतो.चालू आर्थिक वर्षातही मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ६ कोटी ८० लाख ७२ हजार रूपयांचा निधी थकला आहे. कुशलचा निधी मिळत नसल्याने याचा परिणाम अकुशल कामावरही होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यांपासून जिल्हाभरातील रोहयोची कामे ठप्प पडली आहेत. धानाचा हंगाम संपला असल्याने मजूरवर्ग रोहयोच्या कामांच्या प्रतीक्षेत आहे. ेकामे ठप्प असल्याने रोजगारासाठी वनवन करावी लागत आहे.चार महिन्यांपासून ५ कोटींचा कुशल निधी थकलारोजगार हमी योजनेत अकुशल निधीचा अपवाद वगळता कधीच टंचाई जाणवत नाही. मात्र कुशल निधी बºयाच वेळा उपलब्ध होत नाही. मागील चार महिन्यांपासून कुशल कामांचा निधी उपलब्ध झाला नाही. सुमारे ५ कोटी २२ लाख ७८ हजार रूपयांचा निधी थकला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यात ५१ लाख २४ हजार, आरमोरी तालुक्यातील १५ लाख ६५ हजार, भामरागड तालुक्यातील १३ लाख ६६ हजार, चामोर्शी तालुक्यातील २६ लाख ७१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ४३ लाख ६५ हजार, धानोरा तालुक्यातील ८४ लाख ६२ हजार, एटापल्ली तालुक्यातील ११ लाख ५४ हजार, गडचिरोली ४० लाख १५ हजार, कोरची ५८ लाख ७४ हजार कुरखेडा ७९ लाख ४ हजार, मुलचेरा १९ लाख ६५ हजार व सिरोंचा तालुक्यातील ७८ लाख १३ हजार रूपयांचा निधी रखडला आहे.