शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

२४ हजारांवर मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:40 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत जिल्हाभरात एकूण ८७२ कामे सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून २४ हजार २४२ नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीची कामे संपल्याने गेल्या काही दिवसांपासून रोहयोच्या कामांची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात ८७२ कामे सुरू : रोहयोच्या कामावर मजुरांची उपस्थिती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून सद्य:स्थितीत जिल्हाभरात एकूण ८७२ कामे सुरू आहेत. या कामाच्या माध्यमातून २४ हजार २४२ नोंदणीकृत मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेतीची कामे संपल्याने गेल्या काही दिवसांपासून रोहयोच्या कामांची मागणी ग्रामीण भागात वाढली आहे.नोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतचा कायदा शासनाने केला असून रोजगार हमी योजनेंतर्गत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात जवळपास पाच लाख नोंदणीकृत मजूर आहेत. शेतीची कामे दिवाळीनंतर आटोपल्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी वाढत असते. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, बोडी, मजगी, मामा तलाव, खोलीकरण, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शौचालय, नाडेप कंपोस्ट, घरकूल, सिंचन विहीर आदीसह अनेक कामे केली जातात. ही कामे मार्गी लावण्यासाठी नरेगा विभागाच्या वतीने यंत्रणा व ग्रामपंचायत अशा दोन स्तरावर कामाची विभागणी केली जाते. रोहयोच्या कामाचे प्रत्येक ग्रामपंचायतींना उद्दिष्ट दिले जाते. त्यापूर्वी नरेगा विभागाच्या वतीने रोहयो कामाचा वार्षिक आराखडा मंजूर केला जातो. त्यानंतर पंचायत समितीच्या नियंत्रणात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने रोहयोच्या कामाला प्रारंभ केला जातो.महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के कामे ग्रामपंचायत व ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर केली जातात. जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीपैकी २०० वर ग्रामपंचायती मार्फत हद्दितील गावात सद्य:स्थितीत ७१९ कामे सुरू आहेत. या कामांवर १८ हजार ९१ मजूर कार्यरत आहेत. यंत्रणास्तरावर १५३ कामे सुरू असून या कामावर ६ हजार १९१ मजूर कार्यरत आहेत. ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर मिळून एकूण ८७२ कामांवर २४ हजार २४२ इतकी मजूर उपस्थिती आहे. विशेष म्हणजे, सदर मजूर उपस्थितीतचा आकडा हा सोमवारचा (दि.४) आहे. रोहयोच्या कामावर पुरूषांसोबतच महिला मजुरही मोठ्या संख्येने जात आहेत. काही गावात बेरोजगार युवक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीही कुटुंबाला हातभार लागावा म्हणून रोहयोची कामे करीत आहेत.उन्हाळ्यात रोहयोच्या माध्यमातून जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांना हक्काचा रोजगार प्राप्त होत असतो. गतवर्षी सुध्दा रोजगार हमी योजनेतून अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली होती.ही कामे सुरू आहेत प्राधान्यानेरोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत मजगी, बोडी, शौचालय, घरकूल, शोषखड्डे, पांदन रस्ते, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी कामे प्राधान्याने केली जात आहेत. बाराही तालुक्याच्या ग्रामीण भागात हीच कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रशासनाच्या वतीने ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दोन दिवसांत १० हजार मजूर वाढलेरोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतीपैकी १५० वर ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये ४८६ कामे सुरू आहेत. २ फेब्रुवारी रोजी शनिवारला या कामांवर ७ हजार ८५९ इतकी मजूर उपस्थिती होती. दोन दिवसात ग्रामपंचायतस्तरावरील कामांमध्ये वाढ झाली असून मजूर उपस्थितीचा आकडाही वाढला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसात तब्बल १० हजार २३२ इतकी मजूर उपस्थिती वाढली आहे. आणखी येत्या चार-पाच दिवसांत मजूर उपस्थितीचा हा आकडा ३५ हजारवर पोहोचण्याची शक्यता आहे.घरकूल लाभार्थ्यांना ९५ दिवसांची अतिरिक्त मजुरीरोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या विविध योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या घरकुलाच्या कामाची अतिरिक्त मजुरी दिली जाते. घरकूल लाभार्थ्यांना ९५ दिवसाच्या मजुरीची रक्कम दिली जाते. शासनाच्या योजनेंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना १ लाख ३० हजार रूपये अनुदान दिले जाते. यामध्ये नरेगा अंतर्गत ९५ दिवसांची मजुरी म्हणून २० हजार रूपये अदा केली जातात. अशा प्रकारे घरकूल लाभार्थ्यांना एकूण १ लाख ५० हजार रूपयांचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे, घरकूल बांधकामादरम्यान संबंधित नोंदणीकृत मजूर इतरत्र कोणत्याही कामावर जात नसल्याने त्याची मजुरी बुडते. भरपाई म्हणून नरेगा अंतर्गत ९५ दिवसांची मजुरी दिली जाते.