शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना २५ लाखांची अतिरिक्त मजुरी अदा

By admin | Updated: February 11, 2017 01:43 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी

रोहयो : ०.०५ टक्के विलंब आकाराने नुकसान भरपाई गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्याच्या कालावधीत सन २०१६-१७ या वर्षात तब्बल २५ लाख ९७ हजार ६४७ रूपयांची मजुरी संबंधित मजुरांना विलंबनाने अतिरिक्त मजुरी म्हणून अदा करण्यात आली आहे. सदर कार्यवाही जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत हजेरीपत्रक बंद झाल्यापासून १५ दिवसांच्या आत रोहयोच्या कामावरील सर्व मजुरांना १५ दिवसांच्या आत मजुरीची रक्कम अदा करणे हे रोजगार हमी योजनेच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. जर १५ दिवसांच्या आत संबंधित मजुरांना मजुरीची रक्कम अदा केली नाही तर हजेरी पत्रक बंद झाल्यानंतर १६ व्या दिवसापासून प्रती दिवस देय असलेल्या मजुरीवर ०.०५ टक्के दरानुसार नुकसान भरपाई म्हणून विलंब आकाराने मजुरीची रक्कम अदा केली जाते. या कायद्याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात अहेरी आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा व सिरोंचा हे बाराही तालुके मिळून एकूण २७ लाख ८० हजार ५६७ रूपये इतकी विलंब आकाराने अतिरिक्त मजुरी प्रशासनाला प्रदान करावयाची होती. यापैकी जानेवारी २०१७ पर्यंत जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाने एकूण २५ लाख ९७ हजार ६४७ रूपये इतकी विलंब आकाराने अतिरिक्त मजुरी अदा केली आहे.रोहयोतून जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात ५० टक्के ग्रामपंचायतस्तरावर व ५० टक्के यंत्रणास्तरावर शेततळे, सिंचन विहिर, शौचालय, तलाव खोलीकरण, बंधारा निर्मिती, खोदतळे, रोपवाटीका, कुपनलिका, गांडूळ खत निर्मिती आदीसह विविध कामे केली जातात. सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची कामे वार्षिक कृती आराखड्यात नरेगा अंतर्गत मंजूर करण्यात आली. या कामांवर हजारो मजूर कार्यरत होते. मात्र काम पूर्ण होऊन हजेरीपत्रक बंद झाल्यानंतरही शेकडो मजुरांना मजुरी अदा करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हाभरातील रोहयो मजूर प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करीत होते. मजुरी अदा करण्याच्या कार्यवाहीत विलंब होऊ नये, यासाठी शासनाने अतिरिक्त मजुरी देण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेतला. यानुसार अतिरिक्त मजुरी दिली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)