दणका लोकमतचाप्रशांत ठेपाले आलापल्लीशिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली गावातून रातोरात गायब झालेल्या महात्मा गांधी कॉलेजने मागील आठ महिन्यांपासून थकविलेला पगार अखेर कर्मचाऱ्यांना अदा केला. गडचिरोली जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आला आहे. या शिष्यवृत्ती घोटाळ्याची अहेरी व भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गतही चौकशी सुरू झाली आहे. अहेरी प्रकल्पाचे चौकशी पथक महात्मा गांधी कॉलेज आलापल्ली येथे पोहोचले. त्यावेळी कॉलेजचा सारा गाशा गुंडाळलेला होता. कॉलेजने येथून रातोरात पलायन केल्याची बातमी लोकमतने सर्व प्रथम प्रकाशित केली. या बातमीत या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यांपासूनचे वेतनही देण्यात आले नाही, असेही नमूद केले होते.त्यानंतर या महाविद्यालयाच्या संचालकाने आपल्या जवळचा व्यक्ती ९ मार्च रोजी सोमवारला सायंकाळी ५ वाजता आलापल्ली येथे पाठवून चारही कर्मचाऱ्यांचे ७० हजार रूपयाचे नगदी वेतन अदा केले. लोकमतने आम्हाला वेतन काढून देण्यासाठी तत्परतेने मदत केली, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्या विजय गुप्ता यांच्या घरी हे महाविद्यालय सुरू होते, त्यांनाही आॅगस्ट २०१४ पासूनचे भाडे मिळालेले नाही. त्यांनाही सोमवारी या संस्थाचालकच्या जवळच्या व्यक्तीने हिशोब विचारला. त्यामुळे आपल्यालाही भाडे मिळेल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालय अचानकच गायब झाल्यामुळे आलापल्लीत प्रचंड खळबळ उडाली होती.
‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळाला
By admin | Updated: March 10, 2015 23:59 IST