शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्ली ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांचे पगार चार महिन्यांपासून थकले

By admin | Updated: March 31, 2017 01:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे.

नागरिक त्रस्त : आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंदआलापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात मागील आठ महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्था बंद आहे. ऐन उन्हाळाच्या तोंडावर नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. याबाबत सरपंच व सचिव एकमेकांचे नाव सांगून वेळ मारून नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी आता एल्गार पुकारला असून लोकमतला माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मुप्पीडवार, सुधाकर पेद्दिवार, संतोष तोडसाम, सतीश आत्राम, विनोद अकनपल्लीवार, आशीष झाडे, अल्का सोनुले, चंद्रकला तलांडे, शकुंतला दुर्गम, संगीता तावाडे, अर्चना कोडापे, संगीता इष्टाम, सलीम शेख, कैलाश कोरेत यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायतीला गृहकर, सामान्य पाणीपट्टी कर, सामान्य पावती, दैनिक गुजरी व आठवडी बाजाराच्या लिलावातून उत्पन्न मिळते. मात्र हे कुणीकडे जाते हे सरपंच व सचिवांनाच ठावूक आहे. लाखो रूपयांची आवक ग्रामपंचायतीला असताना मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्याचे वेतन थकलेले आहे. वसुली करीत नाही म्हणून कर्मचाऱ्यांमागे तगादा लावला जात आहे. अत्यल्प कमी वेतनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राबवून घेऊन चार-चार महिने पगार दिले जात नाही. याची ग्रामपंचायत प्रशासनाला लाज वाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया या सदस्यांनी दिली आहे. आठ महिन्यांपासून नळ पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांवर उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सन २०१५ पासून ग्रामपंचायत कार्यालयातील जमा खर्चाचे हिशोब जोपर्यंत सरपंच आणि सचिव सादर करणार नाही, तोपर्यंत प्रत्येक सदस्याचा मासिक सभेवर बहिष्कार राहणार असल्याचे सदर सदस्यांनी लोकमतला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. ३० मार्च २०१७ ला मासिक सभेत सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी पूर्ण हिशोब जोपर्यंत सादर करणार नाही तोपर्यंत बहिष्कार राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे पेसांतर्गत आलेला निधी हा पेसा क्षेत्रातच खर्च करावा लागतो. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये हा पैसा इतरत्र खर्च करण्यात आला. याची चौकशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.