शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देगृहमंत्र्यांची ग्वाही : प्रतिकूल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य असल्याची पावती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीतून उद्योगाला चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून या कामातील सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ना.शिंदे रविवारी (दि.२२) पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पो.अधीक्षक मोहीत गर्ग, अजय बंसल, सुदर्शन या अधिकाऱ्यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली. त्यानंतर ना.शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.गृहमंत्री शिंदे म्हणाले, नक्षल चळवळीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा प्रशासन सर्वंकष योजनांची अंमलबजावणी करुन विकास कामे गतीने करीत आहे. नक्षल चळवळीत येथील स्थानिक युवकांचा समावेश आहे. अशा भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी रोजगाराची निर्मिती करणे काळाची गरज असून याशिवाय युवक मुख्य प्रवाहात येणार नाही. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विद्युत, कृषीवर आधारित उद्योग यावर भर देण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देताना मोठ्या प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करण्याचा शासन विचार करीत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच शेतात उत्पन्न झालेल्या धानाला योग्य भाव मिळेल अशा आधारभूत किमती निश्चित करण्यात येतील, असे गृहमंत्री म्हणाले.जिल्ह्यात रस्त्यांची वाईट अवस्था आहे. कंत्राटदारांच्या कामाचा दर्जा चांगला असावा आणि कामाचा वेग वाढावा, यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात बीआरओच्या कामाप्रमाणे प्रलंबित राहीलेल्या रस्त्यांची, पुलांची कामे प्राधान्याने पुर्ण करुन दळणवळण व्यवस्था चांगली करुन देणार असल्याचे ते म्हणाले.पदभरतीमधील अडचणींसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणारजिल्ह्यात सुधारित बिंदूनामावलीचा आदेश आणि त्याला लगेच दिलेली स्थागिती यामुळे पदभरतीबाबत गोंधळ सुरू आहे. तो दूर करून पोलीस व इतर पदभरतीचा मार्ग दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे आश्वासन ना.शिंदे यांनी दिले. पोलीस विभागाला जे हवं ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे गृहमंत्री म्हणाले.शहीद जवानांना आदरांजलीगृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करु न शहीद जवानांना आदरांजली वाहीली. बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने गोडलवाही येथील उपपोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीही आले होते.

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी