शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरमधील धानावरही हत्तींची वक्रदृष्टी; शेतातील ५० पाेती धानाची नासधूस

By गेापाल लाजुरकर | Updated: November 22, 2023 21:38 IST

कळपाकडून रात्रभर धुडगूस

गडचिराेली : धान कापणीसह बांधणी व मळणीचे काम जाेमात सुरू आहे. अशातच मंगळवारी रानटी हत्तींनी चांभार्डा खैरी रिठ येथील एका शेतकऱ्याने शेतात ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये ठेवलेल्या ५० पाेती धानाची नासधूस रात्रीच्या सुमारास केली. गडचिराेली तालुक्याच्या चांभार्डा येथील शेतकरी उमाजी चनेकार यांनी ठेकापद्धतीने केलेल्या शेतातील धानाची मळणी मंगळवारी दुपारच्या सुमारास केली. ५० पाेती धानाची मळणी करण्यास सायंकाळच झाली. धानाचे पाेती ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये आणत असतानाच दुसऱ्याच बांधीत ट्राॅली फसली.

फसलेली ट्राॅली काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्यासह अन्य मजुरांनी केला. यासाठी दुसरे ट्रॅक्टरसुद्धा बाेलावले. याच प्रयत्नात अंधार झाला. दरम्यान, डाेंगराच्या मार्गाने रानटी हत्ती जाेरजाेरात ओरडत येऊ लागले. तेव्हा कसाबसा आपला जीव वाचावा यासाठी उमाजी चनेकार यांच्यासह त्यांची दाेन्ही मुले व अन्य मजुरांनी शेतातून काढता पाय घेतला. रात्री ८:३० ते ९ वाजताच्या सुमारास रानटी हत्ती शेतात दाखल झाले व हत्तींनी संपूर्ण रात्रभर ट्राॅलीत दाेरखंडाने बांधलेले संपूर्ण ५० पाेती धानाची नासधूस केली. यात शेतकऱ्याचे १ लाख रुपयांवर नुकसान झाले.

चाेहीकडे पसरवले धानाचे पाेतेरानटी हत्तींच्या कळपाने ट्राॅली ठेवलेल्या बांधीपासून जवळपासच्या चार ते पाच बांध्यांमध्ये धानाचे पाेती पसरवली हाेती. प्लास्टिक धाग्यांच्या पाेत्याची जणूकाही चिरफाड हत्तींनी केली. त्यामुळे दाेन ते तीन बांध्यांमध्ये धान पसरले हाेते.

कळपाकडून रात्रभर धुडगूसरानटी हत्तींनी उमाजी चनेकार यांच्या शेतात रात्रभर धुडगूस माजविला. सकाळच्या सुमारास जेव्हा चनेकार यांची मुले व काही लाेक शेतात गेले असता त्यांना हत्तींचा कळप धान खाण्यात दंग असल्याचा दिसून आला.शासनाच्या जीआरनुसार शेतातील उभ्या धान पिकाचीच नुकसानभरपाई देता येते. तरीसुद्धा संबंधित शेतकऱ्याला भरपाई देण्यासंदर्भात पावले उचलली जातील. शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्याची कार्यवाही केली जाईल.- धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वनविभाग वडसा

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली