शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींचा डोंगरी ‘टोला’; लाेकांनी धूम ठाेकून जीव वाचविला!

By गेापाल लाजुरकर | Updated: December 10, 2023 19:35 IST

मिरची पीक उद्ध्वस्त : घरांची पाडापाडी, धान पुंजण्यांची केली नासधूस.

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली : कुरखेडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून रानटी हत्तींचा वावर आहे. हत्तींचा कळप दिवसभर जंगलात विश्रांती करून रात्री धानासह रब्बी पिकांची नासधूस करीत आहे. अशातच शनिवार ९ डिसेंबर राेजी मध्यरात्री रानटी हत्तींनी डाेंगरीटाेला गावावर हल्ला करून येथील दाेन लाेकांच्या घराची पाडापाडी केली; परंतु हत्तींचा कळप येत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी जवळच्या धानाेरी गावाच्या दिशेने धूम ठाेकून जीव वाचविला.

कुरखेडा तालुक्याच्या पलसगड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर आहे. पलसगट गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगरीटोला गाव परिसरात शनिवारी हत्ती दाखल झाले हाेते. डाेंगरीटाेला हे गाव अगदी जंगलाला लागून आहे. येथे अवघ्या सात घरांची वस्ती आहे. गावातील नागरिक नेहमीप्रमाणे झाेपी गेले असताना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास हत्तींचा कळप अचानक डाेंगरीटाेला गावाच्या दिशेने आला. याची कुणकुण लागताच गावातील सर्व कुटुंबांनी अवघ्या १ किमी अंतरावरील धानाेरी येथे आश्रय घेऊन हत्तींच्या कळपापासून आपला जीव वाचविला. मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत हत्तींचा कळप डाेंगरीटाेला येथे हाेता. दिवस उजाडताच कळपाने गावातून काढता पाय घेतला.दाेन कुटुंबीय झाले बेघर

रानटी हत्तींनी रवींद्र लक्ष्मण मडावी व लहानू फागू जेंगठे यांचे राहते घर तसेच शेतातील धान पुंजणे उद्ध्वस्त केले. घराची माेडताेड करून घरातील जीवनावश्यक वस्तूंचीही नासधूस केली. यशिवाय नकू मडावी व सनकू मडावी या भावंडाचे धानाचे पुंजणे, सुखदेव मडावी यांच्या उभ्या धान पिकात धुडगूस घातला व जमा केलेल्या धानाचे पुंजणे उपसले. येथीलच श्रीराम कल्लो यांच्या मिरची पिकाची नासधूस केली व धानाचे पुंजणे उपसून फेकले. हाती आलेल्या धान पिकाची नासाडी हत्तींनी केल्याने डाेंगरीटाेला येथील शेतकरी हवालदिल झाले. तसेच दाेन व्यक्तीच्या राहत्या घराची माेडताेड केल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले. दुसऱ्या दिवशी रविवारी घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली