शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा डाव हाणून पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : अहेरी तालुक्यातील कमलापूरचा हत्ती कॅम्प  गुजरातला हलविण्याचा कुटिल डाव केंद्र शासनाकडून सुरू असून कोणत्याही ...

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : अहेरी तालुक्यातील कमलापूरचा हत्ती कॅम्प  गुजरातला हलविण्याचा कुटिल डाव केंद्र शासनाकडून सुरू असून कोणत्याही परिस्थितीत हत्ती कॅम्प बाहेर जाऊ देणार नाही. केंद्र शासनाचा कुटिल डाव हाणून पाडू,  असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी सिराेंचा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. सिराेंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात १४ जानेवारी राेजी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी  सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे, अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख अरुण धुरवे, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, सिरोंचा तालुका संघटक दुर्गेश तोकला उपस्थित होते. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये सध्या ८ हत्ती आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी ४ स्थायी व ८ राेजंदारी माहुत आहेत. कमलापूरचा हत्ती कॅम्प सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे राज्यभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती देऊन कोणत्याही परिस्थितीत कमलापूर येथून हत्ती कॅम्प हलवू देणार नाही, असे किशोर पोतदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान रेपनपल्ली येथे उपवनसरंक्षक सुमित कुमार यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. 

...तर लाेकांच्या असंताेषाचा उद्रेक हाेईल -पंदिलवार

आष्टी : गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील ७ हत्तींचे गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील झूमध्ये स्थानांतरण केले जाणार आहे. याबाबतची माहिती मिळताच जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी यास विराेध केला आहे. हत्तींचे स्थानांतरण केल्यास जिल्ह्यातील लाेकांच्या असंताेषाचा उद्रेक हाेईल. ही स्थिती येण्यापूर्वी शासनाने दखल घेऊन हत्तींचे स्थानांतरण राेखावे, अशी मागणी जि. प. सदस्य तथा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा वनवैभवाने  समृद्ध आहे. यातच कमलापूर येथील हत्ती कॅम्प पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळे या जिल्ह्याला महत्त्व आहे. जिल्ह्यातील एकमेव पर्यटनस्थळ म्हणून हजारो लोक येथे येत असतात. येथील हत्तिणीने नुकतेच एका पिलाला जन्म दिला आहे. त्यामुळे हत्तींची संख्या वाढत आहे. पर्यटन वाढविण्यासाठी येथील हत्ती कॅम्पचा विकास करावा; परंतु कॅम्पमधून हत्तींचे स्थानांतरण करू नये, अशी मागणी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग