शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

विद्युतीकरण घोटाळा थंडबस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:07 IST

देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले असताना अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. जवळपास दोन कोटींच्या या कामात तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दोषी आहेत.

ठळक मुद्देदेसाईगंजमधील प्रकार : समितीने ठपका ठेवला तरी गुन्हे दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज शहरातील चार रस्त्यांवरील विद्युतीकरण कामात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले असताना अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही. जवळपास दोन कोटींच्या या कामात तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकारीही दोषी आहेत. त्यामुळे नगर विकास विभागाच्या आयुक्तांनी कारवाईचे निर्देश दिले. मात्र तीन महिने लोटले तरी हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. त्यामुळे या प्रकरणात कुठे पाणी मुरतेय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात देसाईगंजच्या माजी नगरसेविका कल्पना अशोक माडावार यांनीही बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. नगरोत्थान जिल्हा वार्षिक योजनेतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या या कामासाठी १ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला मुख्य अभियंता (तांत्रिक), सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली होती. मात्र खांबांच्या उभारणीपासून तर दिवे लावण्यापर्यंत सर्वच ठिकाणी घोळ झाल्याचे समोर आले आहे.देसाईगंज नगर परिषदेने सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार ८ आॅगस्ट २०१३ रोजी रस्ता दुभाजक एलईडी लाईट फिटींगसह विद्युत खांब उभारणीच्या कामास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती. जिल्हा नियोजन समितीत ६ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र कामातील घोळाच्या तक्रारी मिळाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमुने केलेल्या चौकशीत काम न करताच कंत्राटदारास देयकांची रक्कम प्रदान करणे, तांत्रिक मंजुरीनुसार फिलीप्स कंपनीचे दिवे लावायचे असताना त्याऐवजी दुसºयाच कंपनीचे दिवे खरेदी करणे, तांत्रिक तपासणी न करताच ८० टक्के अग्रीम देणे, सा.बां. विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त न करणे आदी बाबी घडल्याचे दिसून आले. या प्रकरणात कंत्राटदार-पुरवठादार, तत्कालीन मुख्याधिकारी सुद्धा दोषी आढळले आहेत.आयुक्तांच्या आदेशाला प्रशासनाकडून खोया घोटाळ्याला तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. विभागीय आयुक्तांच्या चौकशीनंतर नगर पालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले. परंतू प्रत्यक्ष अजूनपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कारवाई होऊ नये म्हणून प्रशासनावर राजकीय दडपण तर येत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.