गडचिरोली : महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा ३८ वा वर्धापन दिन ४ सप्टेंबर रोजी सर्कल आॅफिससमोर साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्याबाबत वीज कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. कार्यकारी अभियंता म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता गजेंद्र गडकर, पोटे, चव्हाण, चरपे, जांभुळे, गोरे, एम. जी. चिचघरे, माजी सर्कल अध्यक्ष चावके, विद्यमान सर्कल अध्यक्ष जी. एम. कोहळे, विभागीय अध्यक्ष आर. डी. ढोंगे, विभागीय सचिव बी. बी. गेडाम, सहसचिव बघेल, दुधबळे, मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना वीज कामगारांनी आपल्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा, गडचिरोली जिल्ह्यात विद्युत कर्मचाऱ्यांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने योगदान दिले पाहिजे, सर्व सामान्य नागरिकांना आपल्या सेवेचे समाधान मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी उपस्थित सर्व वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांना समाधानकारक कामाची शपथ देण्यात आली. आभार कोडापे यांनी मानले. (प्रतिनिधी)
वीज कर्मचाऱ्यांनी समाधानकारक सेवेची घेतली शपथ
By admin | Updated: September 5, 2015 01:32 IST