शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० गावांची वीज समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अधिक आहेत. तसेच कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचीही समस्या गंभीर आहे.

ठळक मुद्दे३३ केव्ही उपकेंद्र : कोटगूल, अहेरी, कमलापूर, पेरमिली व कसनसूर येथे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरची तालुक्यातील कोटगूल, अहेरी तालुक्यातील कमलापूर, पेरमिली, अहेरी व एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. सदर उपकेंद्र निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या वीज उपकेंद्रांचे बांधकाम झाल्यास दुर्गम भागातील जवळपास १०० गावांची समस्या सुटणार आहे.गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अधिक आहेत. तसेच कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचीही समस्या गंभीर आहे.जिल्ह्याच्या विस्ताराच्या तुलनेत वीज उपकेंद्रांची संख्या कमी आहे. ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केल्यास कमी दाब व वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या दूर होईल, ही बाब लक्षात घेऊन वीज विभागाने कोटगूल, कमलापूर, पेरमिली, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव पाठविला होता.अहेरी उपकेंद्राला यापूर्वीच मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोटगूल, कमलापूर, पेरमिली व रेगुंठा येथील वीज केंद्रांना निधी व मंजुरी प्रदान करण्याचा शासन निर्णय उद्योग, उर्जा व कामगार विभागाने १६ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. कोटगूल उपकेंद्रासाठी ८ कोटी १७ लाख, कमलापूर उपकेंद्रासाठी ८ कोटी ७३ लाख, पेरमिली उपकेंद्रासाठी १९ कोटी, ३९ लाख, रेगुंठा उपकेंद्रासाठी ८.६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महावितरणने प्रस्ताव सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपकेंद्रासाठी पाठविला होता. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी वीज केंद्र न उभारता ते एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे उभारले जाणार आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी दिली आहे.आदिवासी विकास विभागाचा निधीगडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये वीजेची समस्या आहे. या परिसरातील विजेची समस्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. वीज उपकेंद्र नसल्याने दुर्गम भागातील टोल्यांवर विजेची समस्या अतिशय गंभीर होती. बऱ्याच गावांमध्ये अतिशय कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. यामुळे वीज उपकरणेही व्यवस्थित काम करीत नव्हती. वीज उपकेंद्रांचे बांधकाम झाल्याने वीजेची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्या विरळ असली तरी प्रत्येक गावाला वीज पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे.

टॅग्स :electricityवीज