शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी रखडली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:53 IST

तब्बल सव्वा वर्षापासून बैठकच न झालेल्या जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची नव्याने निवड करण्यासाठीची प्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून खोळंबली आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती अधांतरी : अद्याप निर्णय नाही, इच्छुकांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल सव्वा वर्षापासून बैठकच न झालेल्या जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची नव्याने निवड करण्यासाठीची प्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून खोळंबली आहे. आदिवासी सदस्यांच्या आरक्षणावरून दुसºयांदा निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली. पण आता त्याला पंधरवडा पूर्ण होत असताना अद्याप नवीन आरक्षण जाहीर न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्हा नियोजन समितीमधील २४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आरक्षणात आदिवासी सदस्यांना डावलल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उचलल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यावर सरकारदरबारी दाद मागितली होती. त्यामुळे गेल्या १२ सप्टेंबर रोजी नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याचा आदेश मंत्रालयातून जिल्हाधिकाºयांना देण्यात आला. त्यामुळे सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा थांबविण्यात आली. परंतू त्यानंतर आतापर्यंत नवीन आरक्षण जाहीर झाले नसल्यामुळे डीपीसी सदस्यांच्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात डीसीपी सदस्यांचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर प्रवर्गनिहाय द्यावे अशी मागणी खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, जि.प.उपाध्यक्ष भाग्यश्री आत्राम व इतर पदाधिकाºयांनी केली आहे. अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ही मागणी तत्काळ मान्य केली. असे असताना नवीन आरक्षण काढण्यासाठी वेळ का लावला जात आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.इतर जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक केव्हाच आटोपली असून त्यांच्या बैठकाही आटोपत आहेत. पण गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात सव्वा वर्षापासून बैठक झाली नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया तातडीने करून बैठक घ्यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली आहे.