शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:16 IST

आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.

ठळक मुद्दे२६ सप्टेंबरला मतदान : कोरची, धानोरा, अहेरी, एटापल्लीतील गावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.कोरची तालुक्यातील पिटेसूर, मोठाझेलिया, धानोरा तालुक्यातील मुंगनेर, अहेरी तालुक्यातील आवलमरी, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, सरखेडा, वडसा खुर्द, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, मेंढरी बुज., भामरागड तालुक्यातील बोटणफुंडी कुव्वाकोडी, परायनार, फोदेवाडा, नेलगुंडा, धिरंगी, हेडरी व टेकल या १९ ग्रामपंचायींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. एटापल्ली तालुक्यतील जांभिया येथे सरपंच पदाची थेट निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी निवडण्ूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.सोमवारी २७ आॅगस्ट रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.लोकशाहीसाठी निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अमूल्य अधिकार बहाल करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, तसेच ग्रामपंचायत सदस्यपदासाठी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम भागातीलज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यातील बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आहेत. नक्षल चळवळीचा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नक्षल प्रभावित गावांमध्ये निवडणुका घेणे पोलीस व निवडणूक प्रशासनासमोरचे मोठे आवाहन आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जनतेतून सरपंचाची निवड करायची आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांना विशेष उत्सुकता आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तुलनेत सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत