शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

पाच नगरपंचायतींच्या सभापतींची निवडणूक २ डिसेंबरला

By admin | Updated: November 28, 2015 02:44 IST

गुरूवारी पार पडलेल्या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर आता या नगरपंचायतींच्या स्थायी समित्या...

पहिला टप्पा : कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरीगडचिरोली : गुरूवारी पार पडलेल्या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर आता या नगरपंचायतींच्या स्थायी समित्या व विषय समित्या गठित करुन त्यांचे सभापती निवडणे तसेच दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यासाठी २ डिसेंबरला विशेष सभा बोलावण्याचे आदेश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी जारी केले आहेत.गुरूवारी २६ नोव्हेंबर रोजी कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी नगरपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक पार पडली. आता २ डिसेंबरला या पाच नगरपंचायतींच्या स्थायी समित्या, विषय समित्या, त्यांचे सभापतीं व नामनिर्देशित सदस्यांची निवडप्रक्रिया होणार आहे. त्यासाठी २ डिसेंबरला सकाळी १० वाजता संबंधित नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड करावयाची आहे. त्यानंतर स्थायी समिती व विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या ठरवायची आहे. तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष हे कोणत्या समितीचे सभापती राहतील, हेदेखील याचवेळी ठरवायचे आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत विषय समित्या व स्थायी समितीच्या निवडणुकीकरिता संबंधित सदस्यांनी सहायक पीठासीन अधिकाऱ्यांकडे (तहसीलदार) नामनिर्देशनपत्र सादर करावयाचे आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विषय समित्यांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांच्या सभापतींची निवडणूक होईल. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीची निवडणूक घेण्यात येईल. सर्वांत शेवटी स्थायी समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)