शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आठ प्राथमिक शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:02 IST

पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरूजू होण्यास टाळाटाळ : खोटी माहिती भरून दिशाभूल केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पदस्थापनेच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या आठ शिक्षकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.निर्मला रमेश घुटके, सविता संजय भिलकर, सचिन नंदकिशोर साळवे, वनिश्याम बळीराम म्हस्के, बेबी सोमाजी घुग्गुसकर, जगदिश भोगराज मडावी, कविता चंद्राजी गोंगले, निलीमा कोठारे असे निलंबित झालेल्या शिक्षक व शिक्षिकांची नावे आहेत.पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत शासनाच्या बदली पोर्टलवर खोटी माहिती भरून स्थानांतरण करून घेतले होते. चौकशीमध्ये ते दोषी आढळल्याने सात शिक्षकांना भामरागड तालुक्यात तर एका शिक्षकाला सिरोंचा तालुक्यातील शाळेवर नियुक्ती देण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या या निर्णयाविरोधात संबंधित शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिले होते. मात्र सुनावणीदरम्यान त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांना पुन्हा नियमाप्रमाणे भामरागड व सिरोंचा तालुक्यातच नियुक्ती देण्यात आली होती. पण संबंधित शिक्षक कर्तव्यावर रूजू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. परिणामी महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ (१) (अ) नुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.कर्तव्यातील कसूर भोवलीएकाच वेळी आठ शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दुर्गम भागात सेवा देण्यास कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांसाठी ही मोठी चपराक आहे. केवळ बदलीसाठी खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली. सदर शिक्षकांवर कारवाई झाल्याने किमान पुढील वर्षी अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती शिक्षक भरणार नाही, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक