शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यात आठ नागरिकांनी परत केल्या भरमार बंदुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 02:20 IST

ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात ११ नोव्हेंबर रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

भामरागड : ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात ११ नोव्हेंबर रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान सुमारे आठ नागरिकांनी भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. मेळाव्याला ताडगावचे पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय महारूद्र परजने, लालसू मादी आत्राम, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक मीना, एसआरपीएफचे चव्हाण, पीएसआय संदीप पाटील उपस्थित होते. ताडगाव परिसरातील ग्रामीण भागातील जवळपास १ हजार नागरिक उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ५०० व १०० रूपयांचा नोटा बंद झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबतही मार्गदर्शन केले. नागरिकांनी नक्षल्यांचे पैैसे स्वीकारू नये, तसेच सदर पैैसे आपल्या बँक खात्यावर जमा करू नये याबाबत नागरिकांना सजग करण्यात आले. वृद्ध व गरीब नागरिकांना साडीचोळी, भांडे व दैैनंदिन वापराच्या वस्तू भेट देण्यात आल्या. परिसरातील ज्या नागरिकांकडे भरमार बंदुका आहेत त्या त्यांनी पोलिसांकडे जमा कराव्या, संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आठ नागरिकांनी भरमार बंदुका जप्त केल्या. बंदुक असल्यामुळे नक्षलवादी वारंवार सेंट्री म्हणून घेऊन जातात. शिकार करताना वन विभाग व पोलिसांकडून पकडले जाण्याची शक्यतासुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून भरमार बंदुका सुपूर्द करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)