शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

नीलगायीची शिकार करणाऱ्या आठ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस.एम. मडावी, वनरक्षक प्रकाश पोराम, संदीप आंबेडारे, नांगसू गोटा आदी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने पांढरीभटाळ गाव गाठले.

ठळक मुद्देपांढरीभटाळ येथील आरोपी : पायाला जखमी झालेल्या नीलगायीला मारले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : निलगायीची शिकार करून मांस घरी आणल्याप्रकरणी पांढरीभटाळ येथील आठ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.पावीमुरांडा नियतक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांढरीभटाळ येथील नागरिकांनी निलगायीची शिकार केली आहे. निलगायीचे मांस कापून घरी आणले आहे, अशी माहिती कुनघाडा येथील वन परिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना प्राप्त झाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस.एम. मडावी, वनरक्षक प्रकाश पोराम, संदीप आंबेडारे, नांगसू गोटा आदी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने पांढरीभटाळ गाव गाठले.सर्वप्रथम धनू जाधव यांच्या घराची चौकशी केली असता, त्यांच्या घरी निलगायीचे मांस आढळून आले. धनू जाधव यांच्या मुलाने दारूच्या नशेत वन कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तसेच बळजबरीने सदर मांस शेतातील विहिरीत फेकून देऊन तो पळून गेला. त्यानंतर धनू जाधव याला वन कर्मचाऱ्यांनी चौकशीकरिता बोलाविले असता, त्याने सांगितले की, हिराचंद मनिराम जाधव व उत्तम धनू राठोड हे आपट्याच्या झाडाचे वाक खोदण्यासाठी जंगलात गेले असता, कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे पायाला जखमी झालेली निलगाय आढळली. तिला ठार मारून गावाजवळील नाल्यात आणले. निलगायीचे मांस कापले. यासाठी गावातील भाऊराव आनंदराव पवार, सदूसिंग अमरसिंग पवार, जागेश्वर महादेव लेकामी, विजय बापू गावडे, सुरेश ऋषी मडावी या इसमांनी सहकार्य केल्याची माहिती दिली. त्यावरून मोका पंचनामा करण्यात आला.आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून आठ आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयाने ३१ मे पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके करीत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग