शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

बालकांना मिळणार अंडी व केळी

By admin | Updated: April 5, 2015 01:46 IST

जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील ४.१६ टक्के बालके अतितीव्र तर १६.६४ बालके साधारण कुपोषीत आहेत.

गडचिरोली : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील ४.१६ टक्के बालके अतितीव्र तर १६.६४ बालके साधारण कुपोषीत आहेत. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने नवे पाऊल उचलले आहे. यानुसार आता जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व केळी मिळणार आहेत. या नव्या योजनेसाठी जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आहे. अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालके साधारण व सर्वसाधारण कुटुंबातील असतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने अशा कुटुंबातील बालकांना घरून प्रोटिनयुक्त आहार मिळत नाही. परिणामी कुपोषणाची समस्या उद्भवते. भावी पिढी निरोगी व सुदृढ निर्माण होण्यासाठी बालकांना योग्य आहार मिळणे गरजेचे आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांना प्रोटिनयुक्त आहार मिळावा, तसेच त्यांच्या वजनात वाढ व्हावी, या उद्देशाने राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने वर्षाच्या अखेरीस महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व केळी देण्याची योजना एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राबविण्यात येणार आहे. प्रती मुलगा, प्रती दिवस पाच रूपये प्रमाणे महिना भराच्या खर्चाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेसाठी अनुदान मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण एक हजार ७७१ अंगणवाडी केंद्र आहेत. या अंगणवाडी केंद्रात जवळपास ३० हजार बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)