शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास प्रयत्नशील

By admin | Updated: April 17, 2017 01:36 IST

विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहेत

अशोक नेते यांचे प्रतिपादन : अहेरीत कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन थाटात; दोन हजार शेतकऱ्यांची उपस्थिती गडचिरोली : विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहेत. अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती देण्यासाठी तालुका व महसूल मंडळ स्थळी मेळावे घेऊन परिपूर्ण माहिती द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. कृषी विभाग व आत्माच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील हॉकी मैदानावर आयोजित दोन दिवशीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक उपस्थित होते. मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, जि.प. सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, एटापल्लीचे एसडीओ डॉ. विपीन इटनकर, सीआरपीएफचे द्वितीय कमांडंट जितेंद्र कुमार, पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात धरती अ‍ॅग्रो केमिकल्स, जैन इरिगेशन सिस्टीम लि., तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, बचत गट, सप्तरंगी फॉमर प्रोड्युसर कंपनी, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी, रेशीम संचालनालय नागपूर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ चंद्रपूर तसेच इतर शासकीय विभागाचे मिळून ६० स्टॉल लावण्यात आले होते. विविध कृषी योजनांची माहिती, साहित्य, अवजारे, तसेच कृषी यंत्राची माहिती या स्टॉलद्वारे देण्यात आली. अहेरी, सिरोंचा भामरागड व एटापल्ली या चार तालुक्यातून जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित होते. संचालन तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले. आभार अहेरीचे तंत्र अधिकारी संजय वाकडे यांनी मानले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) आमदारांनी मेळाव्यात घेतला आढावा आमदार डॉ. देवराव होळी यांनी सदर शेतकरी मेळाव्यात भाषण करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली. तसेच शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनांची माहिती व या योजनांचा उपयोग होत नसल्याचे कळताच आमदार डॉ. होळी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली. कृषी विभागाच्या योजनासंदर्भात शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद नकारात्मक असल्याने स्थानिक कृषी अधिकारी मेळाव्यात समोर येत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या बाबीची मेळाव्यात अनेक जण चर्चा करीत होते.