शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

मोहझरीची पाणी पुरवठा योजना रखडली

By admin | Updated: May 30, 2014 00:03 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले.

वैरागड : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे ५९ लाख रूपयाच्या किमतीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र सदर योजनेचे काम अर्धवटच ठेवून काम बंद करण्यात आले. यामुळे मोहझरीवासीयांना ऐन उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी मोहझरी येथे नदीपत्रात विहीर बांधण्यात आली. गावापर्यंत नळाची पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र यानंतरचे काम करण्यात न आल्याने पाणी पुरवठा योजना बारगळली. नळ पाणी पुरवठा योजनेच्या काम कंत्राटदाराला देण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने विहिर खोदली, पाईपलाईन टाकली. मात्र सदर दोनही कामे निकृष्ट दर्जाची केली. परिणामी गतवर्षीच्या पावसाळ्यात जी पाईपलाईन जागोजागी उखडली. नळ योजनेचा पाणी पुरवठा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली उपपाईपलाईनचे जाळे संबंधित कंत्राटदाराने गावात पसरविले नाही. या कामाकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत केली जाते. मोहझरी येथे नळ योजनेचे काम मंजूर करण्यात आले. मात्र सदर काम पूर्ण करण्याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. यामुळेच मोहझरी येथील नागरिकांना यंदाच्याही उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागल्याची खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.