शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कमाईचे पैसे लॉकडाऊनमध्ये संपले, आता करायचे? गडचिरोलीतील कष्टकऱ्यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 13:10 IST

आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील भद्रीतांडा येथे दोन महिन्याआधी लगाम येथील मजुर मिरची तोडायला गेले होते. तिथे गेल्यानंतर तीन दिवसानंतर लॉकडाऊन झाले. तरी पण गावाच्या बाहेर शेतात काही दिवस काम केले. प्रत्येक मजुरांनी जवळपास सहा हजार रुपये कमावले मात्र, एक महिना रिकामे बसून होते. गावाकडे येण्यासाठी शेतमालकने ट्रक करून दिला. भाडे मात्र मजुरांनी दिले 13 तास सिरपूर (कागजनगर) पर्यंत 67 मजुरांनी प्रवास केला. शिरपुर पासून 30 कि.मी. पायी चालत मजुरांनी कवटाला गाठले. या मजुरांमध्ये 36 मजुर चंद्रपूर जिल्ह्यातील होते. कवटाला पोलिसांनी गाडी करून दिली दिली. भुरेपल्ली पर्यंत 24 लगामच्या मजुरांचा प्रवास झाला. नंतर नदीमध्ये स्वयंपाक करून पायी लगामला आले. यात चुटुगुंटा येथील पाच मजुर, काकरगट्टा येथील दोन मजुर होते. ते आपआपल्या गावी शाळेत क्वारंटाइन झाले आहेत. लगाम येथील राजे धर्मराव शाळेत 9 महिला व 8 पुरुष असे एकूण 17 मजुर गेल्या दोन दिवसापासून आहेत. लगाम ग्रामपंचायततर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून साबण, बिस्किट पुडे, सहा मास्क देण्यात आले. विशेष म्हणजे आरोग्य विभागतर्फे एकाही मजुरांची तपासणी करण्यात आलेली नाही. हातावर शिक्के मारून क्वारंटाइन केल्यामुळे या मजुरांना भाजीपाला किंवा किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जाता येत नाही .त्यामुळे प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी या मजुरांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस