शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बुडून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 23:27 IST

आपल्या ५ मित्रासोबत आष्टी-चंद्रपूर मार्गावरील पुलानजिक वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी येथे सोमवारला

आष्टी : आपल्या ५ मित्रासोबत आष्टी-चंद्रपूर मार्गावरील पुलानजिक वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय बालकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आष्टी येथे सोमवारला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.छोटू पप्पू वर्मा रा. कानपूर (उत्तरप्रदेश) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आष्टी येथे गेल्या पाच महिन्यापासून १५ ते २० या वयोगटातील जवळपास १५ मुले नाक्याजवळ असलेल्या कांबळे यांच्या घरी खोली घेऊन भाड्याने राहत होते. सदर मुले आष्टी व गोंडपिंपरी परिसरातील आठवडी बाजारात दुकान लावून चिवळा, बर्फी, जिलेबी व समोसा आदी खाद्य पदार्थाची विक्री करीत होते. किरायाने राहत असलेले सारेच मुले दररोज वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी जात होते. नेहमीप्रमाणे आज सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास या गटातील ५ मुले आष्टी-चंद्रपूर मार्गालगत असलेल्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले. नदीपात्रात उतरल्यावर ते आंघोळ करू लागले. दरम्यान छोटू वर्मा हा आंघोळीच्या नादात खोल पाण्यात गेला. तो पाण्यात बुडूत असल्याचे दिसताच त्याच्या सहकारी मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खोल पाण्यात दूरवर वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे छोटू हा नागपूर येथून आपल्या मावशीच्या घरून भेट घेऊन आष्टीला दोन-तीन दिवसासाठी आला होता. त्याचा मृतदेह सापडला नाही. (प्रतिनिधी)