शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेत शिकलेला पियूष बनला उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:50 IST

नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डातील पियूष सुधीर चिवंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डातील पियूष सुधीर चिवंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.पियूषने पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण गडचिरोली येथे राहूनच घेतले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बीटेकचा अभ्यासक्रम करून पदवी मिळविली. पदवी प्राप्त होताच त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी पुणे येथेच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच वर्षी पियूष एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून मुलाखतीपर्यंत पोहोचला. मुलाखतीमध्ये कमी गुण मिळाल्याने त्याची निवड झाली नाही. दुसऱ्या वर्षी ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडला. तिसऱ्या वेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून उपजिल्हाधिकारी पदासाठी पियूष निवड झाली आहे. यापूर्वी त्याची भारतीय रेल्वेमध्ये सुद्धा निवड झाली आहे. मात्र तो त्याठिकाणी रूजू झाला नाही. यूपीएससीच्या परीक्षेतही मागील वर्षी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती.पियूषचे वडील सुधीर चिवंडे हे देसाईगंज वनविभागाच्या कार्यालयात अधीक्षक पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले तर आई आरडी एजन्ट आहे. पियूषला आयएएस बनण्याची ईच्छा असून उपजिल्हाधिकाऱ्यांची नोकरी करूनही तो यूपीएससीची तयार करणार आहे, अशी माहिती पियूषच्या वडिलांनी दिली आहे.

टॅग्स :collectorतहसीलदार