शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

दोन अर्धवट पुलांमुळे ७० किमींच्या रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 01:24 IST

एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान

कोठी व गट्टा दरम्यानचे पूल बांधकाम अर्ध्यावरच : एटापल्ली-भामरागड दरम्यान आवागमन कठीण भामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान केवळ दोन पुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दोन तालुक्यांदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांचा कालावधी उलटूनही या दोन्ही पुलांचे बांधकाम पूर्ण झाले नाही. भामरागड ते एटापल्लीदरम्यान कोठी व गट्टा ही दोन गावे येतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. या मार्गावर नियमितपणे भामरागडपासून बससेवा सुरू राहते. तर एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ किमीच्या अंतरातही बससेवा नियमितपणे सुरू राहते. फक्त गट्टा ते कोठी या १५ किमीच्या अंतरात दोन पुलांचे बांधकाम रखडले असल्याने एटापल्ली ते भामरागड दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. कोठी व गट्टा या गावांदरम्यान असलेल्या दोन नाल्यांवरील पुलांच्या बांधकामाला सन १९९६-९७ च्या दरम्यान बीआरओच्या मार्फतीने सुरू करण्यात आली होती. पिल्लरपर्यंत कामही करण्यात आले. मात्र नक्षल्यांनी धमकी दिल्याने या पुलांचे बांधकाम अर्धवट सोडून बीआरओने पळ काढला. तेव्हापासून या पुलांचे बांधकामच हाती घेण्यात आले नाही. विकास रखडलापुलांअभावी भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील कारमपल्ली, हलवेर, कियर, पिडमिली तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील गट्टा, जांभिया, अडेंगा, सूरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा या गावांचा विकास रखडला आहे. या गावांमध्ये चारचाकी वाहन जाण्यास अडथळा आहे.