शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीमुळे विदर्भातील रेशीम शेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:10 IST

: टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे.

ठळक मुद्देहजारो कुटुंबांचा रोजगार हिरावणारतंत्र विकसित झाले मात्र झाडे घटली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे. तसेच जुना जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रेशीम शेतीच धोक्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या चार तालुक्यांमध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर रेशीम उत्पादनाची शेती केली जाते. रेशीम तयार करणाऱ्या किटकांचे संगोपन येन, आजन व तुती या झाडांवर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या झाडांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. रेशीम किड्याला हिरवा पाला पोषक राहत असल्याने दरवर्षी या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे तर काही झाडे करपली आहेत. करपलेल्या झाडांच्या जागेवर नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना रेशीम उत्पादन करणाºया नागरिकांच्या संस्थांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वनतस्करांकडूनही झाडांची तोड सुरूच आहे. परिणामी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.मागील दहा वर्षात रेशीम शेतीमध्ये अनेक संशोधन होऊन शेती करण्याचे नवीन तंत्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे टसर रिलिंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या वतीने रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रेशीम उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने रेशीम शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.या शेतीवर भोई समाजाच्या हजारो कुटुंबांचा प्रपंच चालत आहे. मात्र ही शेती बुडाल्यास हे सर्व कुटुंब उघड्यावर पडणार आहेत.

टॅग्स :agricultureशेती