आरमोरी : तालुक्यातील वैरागड परिसरात धान पिकाची रोवणी आटोपून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र मागील दोन दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व सततच्या ढगाळी वातावरणामुळे उन्हाळी धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या ठिकाणी सिंचनाची सोय आहे. अशा ठिकाणी रब्बी हंगाम उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. सध्यास्थितीत काही भागात उन्हाळी धान पिकाची रोवणी सुरू आहे. काही ठिकाणची रोवणी आटोपली आहे. रोवणी झालेल्या धान पिकावर करपा, तुडतुडा, कडाकरपा आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. रोगाच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र सततच्या ढगाळी वातावरणामुळे पिकांवरील रोग आटोक्यात आणण्यात यश आले नाही. अवकाळी पावसामुळे लाखोळी, हरभरा, जवस, कोशिंबिर आदी रबी पिकांचे नुकसान झाले. (वार्ताहर)
उन्हाळी धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
By admin | Updated: March 8, 2015 00:47 IST