शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

अनुदानाअभावी घरकुलाचे काम पडले बंद

By admin | Updated: May 20, 2015 02:05 IST

अहेरी पंचायत समितींतर्गत रमाई घरकूल योजना (ग्रामीण) च्या दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या दरवाजास्तरापर्यंत काम झाले आहे.

जिमलगट्टा : अहेरी पंचायत समितींतर्गत रमाई घरकूल योजना (ग्रामीण) च्या दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या दरवाजास्तरापर्यंत काम झाले आहे. एका लाभार्थ्याच्या घराचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र या तिन्ही लाभार्थ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून दुसऱ्या हप्त्याचे घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. तसेच घरकुलाच्या प्रस्तावासह पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आलेले कागदपत्रे व फोटो गहाळ झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अनुदानाअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा तसचे त्यांचे जीवनमान उंचावे याकरिता शासनाने ग्रामीण भागात रमाई घरकूल योजना कार्यान्वित केली. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेमार्फत पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. रमाई घरकूल योजनेंतर्गत अहेरी पंचायत समितीच्या हद्दीतील गावात २०१३-१४ या वर्षात २३ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक लाभार्थ्यांचे घरकूल रखडले असल्याची माहिती आहे. अहेरी पंचायत समिती अंतर्गत देचलीपेठा येथील श्रीनिवास समय्या कुमरी व स्वामी रामय्या कारेंगला या दोन लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम दरवाजास्तरापर्यंत झाले आहे. त्यामुळे या दोन्ही लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळणे आवश्यक होती. तसेच देचलीपेठा येथील सडवली चंद्रय्या पन्यालवार या लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे सदर तिन्ही लाभार्थी घरकुलाच्या अनुदानापासून वंचित आहेत. आठ महिन्यांपासून घरकुलाच्या अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे हे तिन्ही लाभार्थी घरकूल बांधकामुळे कर्जबाजारी झाले असल्याची माहिती आहे. अनुदान देण्यात यावे, या मागणीकरिता तिन्ही लाभार्थ्यांनी अनेकदा पंचायत समिती कार्यालयात उंबरठे झिजविले. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. (वार्ताहर)पुन्हा कागदपत्रे जुळविण्याची लाभार्थ्यावर पाळीदेचलीपेठा येथील श्रीनिवास कुमरी, स्वामी कारेंगला व सडवली पन्यालवार या तिन्ही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयात जाऊन वारंवार अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र रमाई घरकूल योजनेच्या फाईलमधून प्रस्तावाला जोडलेले कागदपत्रे व फोटो गहाळ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता अनुदानाच्या रक्कमेची उचल करण्यासाठी या तिन्ही लाभार्थ्यांना पुन्हा कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.