शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 15, 2017 01:42 IST

तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

हातपंपातील जलपातळी खालावली : सौर ऊर्जेची पाणी योजनाही बंद अवस्थेत मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावातील दोन हातपंपातील जलपातळी खालावली असून येथील सौरऊर्जेवरील नळयोजनाही बंद अवस्थेत आहे. अडपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. या गावांपैैकी मलकापूर गाव आहे. या गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे केवळ दोन हातपंप आहेत. तसेच २००८ मध्ये जलस्वराज्य योजनेतून ६८ हजार रूपयांचा खर्च करून सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावात पाण्याची टाकी व पाईपही टाकण्यात आले. काही दिवस सुरळीत पाणी पुरवठा झाला. मात्र काही दिवसांतच नळ योजना बंद पडली. अडीच हजारावर लोकसंख्या असतानाही गावात केवळ दोन हातपंप आहेत. सध्या या हातपंपातील जलस्तर घटलेला आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासूनच नळावर गर्दी करावी लागते. सौर ऊर्जेवरील नळ योजनेंतर्गत ८०० लोकांना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या नळ योजनेवर गावातील नागरिक अवलंबून आहेत. परंतु नळ योजना बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील बंद पडलेली सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी रमेश कन्नाके, पत्रू सिडाम, देवेंद्रसिंह, कालिदास भोयर, बंडू सिडाम, राजू दुगे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी) दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती नाही मलकापूर येथे सौर ऊर्जेवरील नळ योजनेच्या पाणी टाकीलगत मोटार बसविण्यात आली. परंतु अल्पावधीतच मोटार नादुरूस्त झाली. त्यामुळे सदर मोटार दुरूस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आली. दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती अद्यापही झाली नाही. या संदर्भात अडपल्ली मालचे सरपंच व ग्राम सचिवांनी सांगितले की, सौर ऊर्जा पाणी योजनेची मोटार खराब झाल्याने सदर मोटार दुरूस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. परंतु दोन वर्षांपासून अद्यापही मोटारची दुरूस्ती का झाली नाही, असा सवाल येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला केला आहे. प्रशासनाने लक्ष घालून सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.