शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रस काढण्याने सिंधीच्या झाडांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:01 IST

सिंधीच्या झाडाला छिद्र पाडून त्यातून रस काढला जातो. यामुळे सदर झाड काही वर्षातच करपून जाते. अशी आजपर्यंत जिल्हाभरातील हजारो सिंधीची झाडे नष्ट झाली आहेत.

ठळक मुद्देधंदा जोमात : चार ते पाच वर्षातच करपते झाड

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंधीच्या झाडाला छिद्र पाडून त्यातून रस काढला जातो. यामुळे सदर झाड काही वर्षातच करपून जाते. अशी आजपर्यंत जिल्हाभरातील हजारो सिंधीची झाडे नष्ट झाली आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास सिंधीच्या झाडाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कोकणात नारळाचे झाड जसे निसर्ग व समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य खुलवते. गडचिरोली जिल्ह्यातील शेतशिवारात नारळाच्या झाडाप्रमाणे दिसणारे सिंधीचे झाड आढळून येते. सदर झाड येथील वन वैभवात अधिकची भर टाकत आहे. मात्र या झाडाचे अस्तित्व आता धोक्यात आल्याचे दिसून येते.हिवाळ्याच्या कालावधीत सिंधीच्या झाडामधून रस निघतो. यासाठी झाडाच्या वरच्या टोकावरील फांद्या तोडून त्या ठिकाणी छिद्र पाडला जातो. तोटीद्वारे रस एका हंडीमध्ये जमा केले जाते. सिंधीचे रस पेणारे काही शौकीन गावात असल्याने त्यांना या रसाची विक्री केली जाते. दिवसेंदिवस सिंधीचे रस विकण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अधिकचे रस निघावे, यासाठी दरवर्षी फांद्या तोडून छिद्र पाडले जाते. मात्र यामुळे सदर झाड चार ते पाच वर्ष रस काढल्यानंतर कायमचे करपून जाते. अशा पध्दतीने वैरागड परिसरातील शेकडो सिंधीची झाडे करपली आहेत. विशेष म्हणजे, सिंधीचे झाड पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. ३० ते ४० वर्षांचे झाड रस काढण्यासाठी तयार होते. वैरागड परिसरातील विहिरगाव, कुकडी, मानापूर, देलनवाडी, या परिसरात सध्या सिंधीच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रस काढण्यामुळे या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत वैरागडचे वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांना विचारणा केली असता, बाभूळ आणि सिंधीचे झाड खासगी शेतात आढळते. त्यामुळे सिंधी काढणाºयांवर कोणतीही कारवाई वन विभाग करू शकत नाही, अशी माहिती दिली.