शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नक्षल्यांच्या विरोधामुळेच दुर्गम भागाचा विकास खुंटला

By admin | Updated: May 11, 2016 01:29 IST

दुर्गम भागात पूल, रस्ते निर्मितीस व शिक्षणाच्या प्रसारास नक्षल्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे

भामरागड : दुर्गम भागात पूल, रस्ते निर्मितीस व शिक्षणाच्या प्रसारास नक्षल्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही नेलगुंडा व परिसराचा विकास थांबला आहे. विकासासाठी पूल, रस्ते व शिक्षण महत्त्वाचे असल्याने या बाबींना नक्षल्यांनी विरोध करू नये, असे नक्षल्यांना ठणकाऊन सांगा, असा सूर नेलगुंडा येथे १० मे रोजी पार पडलेल्या नदी, नाला, पूल विकास परिषदेत उमटला.भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नेलगुंडा गावात भूमकाल संघटनेतर्फे नदी, नाला, पूल विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नक्षलवादावर विचारमंथन करण्यात आले. परिषदेला छत्तीसगडचे के. मधुकरराव, ओडिशाचे भारतभूषण, ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते श्याम पांढरीपांडे, दत्ता शिरके, प्रा. अरविंद सोवनी, प्रा. रश्मी पारसकर, प्रा. श्रीकांत भोवते, प्रा. मिलींद तुळसे आदी विचारवंत उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते श्याम पांढरीपांडे यांनी लोकशाहीमध्ये एकत्र आल्याशिवाय विकास होत नसतो, असे प्रतिपादन केले. जर एखादा समाज निर्भयपणे समोर येत असेल तर त्याचा विकास कुणीच थांबवू शकत नाही, असे मार्गदर्शन केले. भूमकाल संघटनेचे सहसचिव प्रा. अरविंद सोवनी यांनी भामरागड तालुक्याला नद्या, नाल्यांचा तालुका संबोधूून अत्यंत आवश्यक असलेल्या पुलांचा पाढा वाचला. जुव्वी नाला, लाहेरी-होडरी नदी, गुंडेनहोड नाला, भुसेवाडा नाला, नेलगुंडा, कवंडे, बेजूर, कुमारगुडा आदी ठिकाणी पूल नसल्यामुळे स्थानिक माडिया समाजाचा विकास रखडला असल्याचे प्रतिपादन प्रा. अरविंद सोवनी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)नक्षल्यांच्या विरोधानंतरही शेकडोंची उपस्थिती४नेलगुंडा येथील परिषद यशस्वी होऊ नये, यासाठी परिषदेच्या पहिल्याच दिवशी ९ मे रोजी तेंदूपत्ता तोडणी सुरू व्हावी, यासाठी नक्षल्यांनी दबाव टाकला होता. त्याचबरोबर या परिषदेला उपस्थित न राहण्याचा दमही सभोवतालच्या नागरिकांना भरला होता. मात्र नक्षल्यांना न जुमानता परिषदेला नेलगुंडा, गोंगवाडा, मिडदापल्ली, पारायनार, ईरपनार, भटपार, कवंडे, जुव्वी, गोलागुडा, भुसेवाडा येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.