शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीमुळे सुकाळातील इंदिरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: October 6, 2015 01:55 IST

येथून पाच किमी अंतरावर असलेल्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत

वैरागड : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आठव्या वर्गातील सुभाष अनंतराव इष्टाम रा. करैन ता. एटापल्ली या विद्यार्थ्याचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप सुभाषच्या कुटुंबीयांनी तसेच गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. मृतक सुभाष हा २८ सप्टेंबरपासून आजारी होता. सुभाष आजारी असल्याची माहिती त्याच्या गावचा विद्यार्थी सोमजी कोरामी याने शिक्षकांना दिली होती. मात्र याकडे शिक्षक, अधीक्षक, मुख्याध्यापकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन दिवसात त्याची प्रकृती अधिकच खालावली. तेव्हा दोन शिक्षक व एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने सुभाषला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार-पाच दिवसांपासून सुभाष तापाने फणफणत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सुभाषला जीव गमवावा लागला. यासाठी जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आश्रमशआश्रमशाळेच्या या गलथान कारभाराबाबत पालकवर्गांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आश्रमशाळेतील सोयीसुविधांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (वार्ताहर)वर्षातून काही दिवसच येतात अधीक्षक४शाळेचे अधीक्षक म्हणून बी. आर. भरे कार्यरत आहेत. ते संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यसुद्धा आहेत. याचा गैरफायदा उचलणे त्यांनी सुरू केले आहे. वर्षातून अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस ते शाळेत येतात. शाळेत आले तरी रात्रभर कधीच थांबत नाही. केवळ शासनाचे वेतन हडपण्यासाठी अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. अधीक्षक पदाची जबाबदारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सांभाळत असल्याचे दिसून येते. अधीक्षिका राहते भाड्याच्या खोलीत४या आश्रमशाळेत एकूण २४२ विद्यार्थी निवासी राहतात. त्यापैकी विद्यार्थिनींची संख्या १०८ एवढी आहे. विद्यार्थिनींवर देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षिका नेमण्यात आल्या आहेत. मात्र त्या रात्रीच्या सुमारास शाळेत थांबत नाही. शाळेपासून दूर अंतरावर डोमाजी सहारे यांच्या घरी त्या भाड्याने राहतात. रात्रीच्या वेळी एकही स्त्री कर्मचारी या ठिकाणी राहत नसल्याने विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते. येथील कार्यरत कर्मचारी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार मी स्वत: संस्थाचालकांकडे केली होती. पण काहीही उपयोग झाला नाही. आमचे कर्मचारी नियमित तपासणीला येतात. पण येथील कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या आश्रमशाळेत पोळ्यानंतर नऊ विद्यार्थी मलेरियाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत.- डॉ. संजय सुपारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देलनवाडीसुभाषची प्रकृती फारशी गंभीर नव्हती. आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले नाही. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय दाखल करेपर्यंत व्यवस्थित चालत होता. मात्र अचानक प्रकृती बिघडली.- आर. जी. वलादे, सहायक शिक्षक, इंदिरा आश्रमशाळा, सुकाळा