शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

स्वतंत्र मुख्याधिकाऱ्यांअभावी शहर विकास कामात अडथळा

By admin | Updated: July 11, 2016 01:22 IST

भाजपप्रणित राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला.

नगराध्यक्षांचा आरोप : शासनाने तत्काळ स्वतंत्र मुख्याधिकारी द्यावाचामोर्शी : भाजपप्रणित राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. चामोर्शी नगर पंचायतीला स्वतंत्र मुख्याधिकारी देण्यात आले नाही. नगर पंचायत अस्तित्त्वात येऊनही नवीन कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी शहर विकास कामात प्रचंड अडथळा येत आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे नगर पंचायतीकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही, असे प्रतिपादन चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी केले आहे.चामोर्शी येथील वार्ड क्रमांक ५ मधील डोंगरी भागात जवळपास ८०० लोक वास्तव्यास आहेत. मात्र या नागरिकांना अद्यापही अस्थायी पट्टे देण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. चामोर्शी नगर पंचायतीची बैठक ११ मे २०१६ रोजी पार पडली. या बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यात आले. मात्र कोणते निर्णय झाले तसेच ठराव घेण्यात आले, या संदर्भातील इतिवृत्त मुख्याधिकाऱ्यांनी आम्हा पदाधिकाऱ्यांना अद्यापही उपलब्ध करून दिले नाही. आता १२ जुलै रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वतंत्र मुख्याधिकाऱ्यांअभावी शहर विकास कामात गती नसल्याचे नगराध्यक्ष वायलालवार यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)