शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

निधीअभावी माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन धूळ खात

By admin | Updated: July 10, 2015 02:02 IST

मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन २०१२ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले.

राज्य शासनासह इतर विभागांचेही दुर्लक्ष : तीन वर्षांत केवळ ५८० नमुण्यांचे परिक्षणदिगांबर जवादे  गडचिरोलीमानव विकास मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन २०१२ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळत नसल्याने सदर वाहन कृषी विज्ञान केंद्राच्या आवारातच पडून आहे. तीन वर्षाच्या कालावधीत नाममात्र ५८० नमुन्यांचे माती परीक्षण केले आहे. पिकांची निवड व मातीच्या प्रकारानुसार खताची मात्रा देण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक जिल्ह्यात माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेत शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण केल्यानंतर त्याच्या शेताची आरोग्यपत्रिका वितरित केली जाते. या आरोग्य पत्रिकेत मातीचा कोणता प्रकार आहे. हे दर्शविण्यात येते. जिल्हास्थळावर असलेल्या प्रयोगशाळांमध्ये माती आणणे प्रत्येकच शेतकऱ्याला शक्य होत नाही. कधीकधी माती परीक्षापेक्षाही अधिकचा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या निधीतून प्रत्येक जिल्ह्याला माती परीक्षण प्रयोगशाळेचे वाहन उपलब्ध करून दिले आहे.गडचिरोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राला सदर वाहन २०१२ मध्ये उपलब्ध झाले आहे. या वाहनाच्या खर्चासाठी मात्र शासनाने कोणत्याही अतिरिक्त निधीची तरतूद केली नसून शेतकऱ्यांकडून माती परीक्षणाचे पैसे घेऊन त्यातून वाहनाचा खर्च भागविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. अत्याधुनिक माती परीक्षणाची प्रयोगशाळा असलेले हे वाहन जवळपास १० लाख रूपये किमतीचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्वत: माती परीक्षणाचा खर्च देण्यास शेतकरी वर्ग तयार नाही. परिणामी सदर वाहन शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन माती परीक्षण करण्यास कृषी विज्ञान केंद्राला अनेक अडचणी येत आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ ५८० माती परीक्षाचे नमुने घेण्यात आले. खर्च मिळत नसल्याने सदर वाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयासमोर पडून आहेत. या वाहनाचा पुरेपूर उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. तत्काळ मिळते आरोग्यपत्रिकाया वाहनामध्ये माती परीक्षणाची अत्याधुनिक लॅब बसविण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माती घेऊन त्याच ठिकाणी मातीचे परीक्षण केले जाते. काही तासात शेतकऱ्याला माती परीक्षणाचा अहवाल दिला जातो व आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शनही केले जाते. यासाठी केवळ १५० रूपये शुल्क आकारल्या जाते. राज्य शासनाची जिल्हास्थळावर माती परीक्षणाची लॅब आहे. या ठिकाणी १०० ते २०० किमीचे अंतर पार करून माती आणणे व त्याचा अहवाल प्राप्त करणे या तुलनेत वाहनातील प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या वाहनासाठी निधीची तरतूद करावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. आदिवासी विकास विभागाने दोन हजार माती परीक्षणाचे नमुने तपासण्यास परवानगी दिली होती. मात्र अजुनपर्यंत त्यासाठीचा निधी प्राप्त झाला नाही. त्याचाही पाठपुरावा केला जात आहे. शेतकरी स्वत: पैसे देऊन माती परीक्षण करून घ्यावे, यासाठीही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फतीने नजागृती केली जात आहे.-डॉ. एस. पी. लांबे, कार्यक्रम समन्वय, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली