शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खानसामांअभावी सिरोंचातील विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 22:27 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे.

ठळक मुद्देबंदचा फलक कायमच : अधिवेशनावरून अद्यापही परतले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. नागपुरात गेलेले संबंधित खानसामा सिरोंचा येथे न परतल्याने सिरोंचातील विश्रामगृह बंदच असून सार्वजनिक विभागाने लावलेला बंदचा फलक अद्यापही दर्शनी भागावर कायम आहे.पुढील आदेशापर्यंत विश्रामगृह बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी फलकातून केले आहे. सिरोंचा येथील साबांविचे हे विश्रामगृह ब्रिटीशकालीन असून ते १०० वर्षापूर्वीपासूनचे सुस्थितीत आहे. सिरोंचा येथे कालेश्वर दर्शनासाठी तसेच इतर कामासाठी विविध नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सिरोंचा येथे इतरत्र निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेच सर्वप्रथम वळतात. मात्र खानसामाअभावी हे विश्रामगृह गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने पर्यटकांची प्रचंड पंचाईत होत आहे.खासगी विश्रामगृहापेक्षा या शासकीय विश्रागृहाचे भाडे कमी राहत असल्याने पर्यटकांची पसंती याच विश्रामगृहाला अधिक असते. शासकीय विश्रामगृहालगत बालाजी मंदिर असून समोरच्या भागात बगिचा आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदीसह संपूर्ण विदर्भातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे हिवाळ्यात येत असतात. मात्र विश्रामगृह बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खानसामाअभावी सदर विश्रामगृह बंद ठेवण्यास जबाबदार असणाºया संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.