शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी न घेतल्याने पदवीप्राप्त शिक्षक अडचणीत

By admin | Updated: November 14, 2016 02:10 IST

जिल्हा परिषद अंतर्गत उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहा ते आठला अध्यापन करण्यासाठी शिक्षण विभागाने

गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहा ते आठला अध्यापन करण्यासाठी शिक्षण विभागाने सेवारत पदवी, बीएड, डीएड अहर्ताधारक प्राथमिक शिक्षकांची पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती देण्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत. मात्र यामध्ये अनेक शिक्षकांनी वाढीव पदवी प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंजुरीच न घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. नियमबाह्य पदवीप्राप्त करणारे अनेक शिक्षक या पदापासून हद्दपार होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. शालेय शिक्षण विभागाने १३ आॅक्टोबर २०१६ रोजी पदवीधर शिक्षकांच्या भरतीबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये उच्च प्राथमिक स्तरावर विज्ञान, भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषय संवर्गातील प्रत्येकी किमान एक या प्रमाणे प्रशिक्षीत पदवीधर अहर्ताधारक शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने पदवीधर प्राथमिक शिक्षकाचे प्रस्ताव विकल्पासह शिक्षकांकडून मागितले आहेत. मात्र यामध्ये अनेक शिक्षकांनी १२ वी डीएडनंतर वाढीव पदवीसाठी खाते प्रमुखांची मंजुरी घेतली नाही. शाळेला दांड्या मारून परस्पर पदव्या प्राप्त केल्या आहेत. या पदवीची नियमबाह्यपणे सेवा पुस्तकात नोंद करून घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या पदासाठी शासकीय नियमानुसार पात्र असणाऱ्या बीएडधारक शिक्षकांवर अन्याय होणार आहे. पदवीधर शिक्षकांच्या पात्रतेसंबंधी गडचिरोली जिल्हा परिषदेतील १३२ बीएडधारक शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिठ याचिका दाखल केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती उठवून युक्तिवादासाठी मंजूर केली आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या निकालावरच अवलंबून राहणार आहे. पदवीधर शिक्षकांची पदे लाटण्यासाठी काही शिक्षक खोटी कागदपत्रे जोडण्याचा सुध्दा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. पारदर्शक पध्दतीने प्रशासनाने शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)